Kolhapur Vidhan sabha Election Mahayuti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Vidhan sabha Election : कोल्हापुरातून महायुतीची तोफ धडाडणार, 20 ऑगस्टला विधानसभा प्रचाराचा नारळ फोडणार

Rahul Gadkar

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर महायुती पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. महाविकास आघाडीला रोखण्यासाठी अनेक विकास काम, योजना जनतेसमोर आणून विधानसभेची पायाभरणी केली आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाचे आमदार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने 288 पैकी सर्वच जागांवर व्यक्तिगत लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात दौरे, बैठका, मेळाव्यांचा जोर वाढला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) महायुती म्हणून लढणार असल्याने सर्वच पक्षांनी एकजूट येत विधानसभेचा प्रचाराचा नारळ फोडण्याची तारीख ठरवली आहे. येत्या 20 ऑगस्टला कोल्हापुरात महायुतीची सभा होणार आहे. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे देखील उपस्थित असणार असल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा महायुतीने कंबर कसली असून, येत्या 20 ऑगस्टला कोल्हापूरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार असून सायंकाळी सभा होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी केंद्रीय मंत्र्यांना देखील आणण्याची तयारी माहितीतील प्रमुख नेत्यांची आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापुरातून 20 ऑगस्ट पासून प्रचाराला सुरुवात होणार. महायुती सर्वच नेते उपस्थित राहणार 20 तारखेपासून राज्यात सर्वत्र एकत्र सभा संपन्न होणार आहेत. ७ विभाग आणि २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी विभाग निहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याचा निर्णय झाला. तसेच विभाग स्तरावर या तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT