लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली खरी, पण ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला. मात्र, त्यामुळे सांगली लोकसभेवरून मविआत तिढा निर्माण झाला होता. त्याप्रमाणे कोल्हापुरमधील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी दहा पैकी पाच जागांवर दावा केला असून कार्यकर्त्यांना तयारी लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीची तयारीला जोर धरला आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीला वेग आला आहे.
नुकतीच कोल्हापूर (Kolhapur) शहरात शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना, कोल्हापूर उत्तर मतदारसंघासह जिल्ह्यातील इतर पाच जागांवर दावा केला जाणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी स्पष्ट केले.
क्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला व महाविकास आघाडीला मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून जनतेपर्यंत शिवसेनेची ध्येय धोरणे व ‘मशाल’ चिन्ह पोहोचवावे, असे आवाहन केले.
केवळ एक विद्यमान तोही शिंदे गटाचा एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा (Shivsena) भगवा फडकला असताना यावेळी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर तोही विद्यमान आमदार शिंदे गटात दाखल झाला. लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे असताना देखील ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
मात्र शिवसेना शिंदे गटाने दोन्ही जागा आपल्या सोबत ठेवल्या. लोकसभेला एक जागा दिल्यानंतर ठाकरे गटांनीही जिल्ह्यातील पाच जागांवर आपला दावा कायम ठेवला आहे. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाने चार जागांवर आपला दावा कायम ठेवला आहे. तर काँग्रेसकडे विद्यमान चार आमदार असल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची लक्ष आता जागा वाटपाकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.