Kolhapur Politics News : निकाल लागून ३ आठवडे झाले तरी अजूनही कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कोणाचा अध्यक्ष होणार याबाबतची महायुतीमधील चर्चा कायम सुरुच आहे. एकीकडे संख्याबळानुसार अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. त्याचवेळी भाजपही अध्यक्षपदासाठी अडून बसला आहे. आता ही चर्चा कोल्हापूमधून मुंबईमध्ये सुरु झाली आहे. मुंबईमध्ये बैठक होऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अध्यक्षपद आणि महापालिकेवर सभापती पदाचा निर्णय घेतला जाणार आहे.
महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदांबाबत चर्चा होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी याबाबत चर्चा होणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांसह कोल्हापूर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नावांबाबत चर्चा होणार आहे. कोल्हापुरात नगरपालिकांचे नगराध्यक्ष, महापौरसुद्धा महायुतीचे झाले आहेत. आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. 17 मार्चला ही अध्यक्ष निवड होणार आहे.
एकीकडे जिल्हा परिषदेमध्ये जास्त जागा घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील पहिला अध्यक्ष मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या परिस्थितीत गेल्या महिनाभरापासून रखडलेली चर्चा शेवटपर्यंत ताणून भाजप आपल्याकडे पहिलं अध्यक्षपद मिळवण्याच्या तयारीत आहे. अध्यक्षपदाबरोबर या बैठकीत सभापतिपदासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
कोल्हापूर महापालिकेतील परिवहन समिती सभापती, शिक्षण समिती सभापती यांच्याबाबतही निर्णय झालेला नाही. तिथल्या इच्छुकांचीही संख्या जास्त आहेत, परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादीला द्यायचे की शिवसेनेला द्यायचे, याबाबतही चर्चा होणार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक पक्षाला सभापती, उपमहापौर, महापौर पदे मिळणार आहेत. मात्र पहिल्यांदा कोणाला याबाबतही अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.