Iran-Israel War : इस्रायल-इराण युद्धातून जीव मुठीत घेऊन कोल्हापुरकर सुखरूप घरी परतले; दुबई प्रशासनाची दिलगिरी अन् प्रत्येकाला २६ हजाराचं गिफ्ट

Dubai Gift To Kolhapurkar's : अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर भारतातील हजारो पर्यटक आखाती देशात अडकले होते. यावेळी युद्धामुळे काही कोल्हापूरकर देखील दुबई अडकले होते.
Iran-Israel War
Iran-Israel Warsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे दुबईसह आखाती देशांतील अनेक उड्डाणे रद्द झाली.

  2. कोल्हापूरच्या हुपरीतील 25 जणांचा ग्रुप दुबईत अडकला होता, त्यातील काही जण मायदेशी परतले आहेत.

  3. दुबई प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत प्रत्येक प्रवाशाला 26000 ची भेट दिली आहे.

Kolhapur News : इराणच्या विरोधात अमेरिका-इस्रायलने युद्ध छेडले असून आता युद्धाने रौद्र रूप घेतले आहे. अमेरिका-इस्रायल इराणच्या विविध भागांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. तर या हल्ल्यांच्या प्रत्त्युरात इराणने अमेरिकेच्या एअर बेसला लक्ष केले आहे. या होणाऱ्या हल्ल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे लाखो पर्यटकांसह भारतीय पर्यटकही आखाती देशांमध्ये अडकले होते. यातील काही आता मायदेशी परतले असून यात काही कोल्हापुरकर देखील आहेत.

अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर मुंबई पुण्याहून परदेशी जाणारी अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच दुबईसह आखाती देशातून भारताकडे होणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. ज्यामुळे अनेक भारतीय पर्यटक अडकले होते. यादरम्यान राज्य सरकारने पावले उचलत या पर्यटकांना पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केलेत.

दरम्यान ज्या विमान कंपन्यांची तिकीट पर्यटकांनी बूक केले होते त्या कंपन्यांनी भारतीय पर्यटकांना परत आणण्यासाठी धडपड केली. यानंतर सोमवारी रात्रीपर्यंत अडकलेल्या भारतीय पर्यटकांपैकी काही प्रवासी सुखरुपरित्या भारतात आले आहेत. ज्यात कोल्हापूर येथील २५ जणांचा ग्रुप आहे.

Iran-Israel War
Israel Iran War : मोठ्या हॉटेलमध्ये थांबू नका, दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना गिरीश महाजनांनी का दिला असा सल्ला?

यावेळी दुबई प्रशासनाने घडत असलेल्या प्रकरणाविषयी दिलगिरी व्यक्त करत या प्रवाशांना प्रत्येक व्यक्तीला 26 हजार रुपयांचे गिफ्ट दिले आहे. मात्र इराण-इस्रायल हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आखाती देशांमधून उड्डाण घेतलेल्या दोन विमानांपैकी एका विमानांमध्ये कोल्हापूरचा हा ग्रुप होता.

हा ग्रुप दुबईमध्ये ज्या ठिकाणी राहिला होता. तेव्हा त्यांच्या हॉटेलच्या आजूबाजूला हल्ले झाले होते. तर या सर्व ग्रुपने दुबईमध्ये होणारे हल्ले, तिथल्या विमानतळाची अवस्था आणि आकाशातून हल्ले झाल्यानंतर धुराचे लोट यांनी पाहिलं आहेत. या वातावरणात जीव मुठीत घेऊन हा सगळा ग्रुप दुबईमधून अबुधाबीला बाय रोड बाहेर पडला. या ग्रुपने भारतात येणाऱ्या दोन विमानापैकी एका विमानाचे बुकिंग केलं होतं. त्यामुळे सुदैवाने कोल्हापूरमधील हा संपूर्ण ग्रुप कोल्हापूर तेथे दाखल झाला. यामुळे सर्व प्रवाशांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं.

Iran-Israel War
US-Israel War against Iran: इराणचा जहाजावर मोठा हल्ला; तीन भारतीयांचा मृत्यू

FAQs :

1. कोल्हापूरचे किती पर्यटक दुबईत अडकले होते?
हुपरीतील 25 जणांचा एक ग्रुप दुबईत अडकला होता.

2. उड्डाणे का रद्द करण्यात आली?
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उड्डाणे रद्द झाली.

3. दुबई प्रशासनाने काय मदत केली?
प्रत्येक प्रवाशाला 26000 ची भेट देऊन दिलगिरी व्यक्त केली.

4. सर्व पर्यटक परतले आहेत का?
काही पर्यटक मायदेशी परतले असून इतरांच्या परतीची प्रक्रिया सुरू आहे.

5. या संघर्षाचा पर्यटनावर काय परिणाम झाला?
मध्यपूर्वेतील तणावामुळे विमानसेवा आणि पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com