Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील मातब्बरांना त्याचा फटका बसला आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा डाव अनेकांचा उधळला आहे. तर जिल्ह्यातील मातब्बरांचा गड शाबूत राहिला आहे. ज्यांच्या मतदारसंघावर आरक्षण पडले आहे ते इतर मतदारसंघ शोधणार की निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार हे पहावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिला आरक्षण असल्याने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांच्या पत्नी रोहिणी पाटील यांना संधी चालून आली आहे.
मिनी मंत्रालयात म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची रणधुमाळी आरक्षण सोडत झाल्यानंतर आजपासून पाहायला येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून काही मातब्बरानी पुन्हा तयारी केली होती. मात्र आरक्षण पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. हातकणंगले तालुक्यात 11 पैकी सहा गट आरक्षित झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, अरुण इंगवले, माणगावचे सरपंच राजू मगदूम, माजी सभापती वंदना मगदूम त्यांच्यासह अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. आता हे दिग्गज नवीन मतदार संघ शोधणार का हे पहावे लागणार आहे.
माजी उपाध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक सतीश पाटील हे गेल्या वेळेला गिजवणे मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा आरक्षण सोडतीमध्ये हा मतदारसंघ सर्वसाथारण महिला गटासाठी राखीव जाहीर झाला. यामुळे सतीश पाटील यांची या मतदारसंघातून संधी हुकली. आता त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार संजय घाडगे यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांचा सिद्धनेर्ली हा मतदारसंघ यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यामुळे घाटगे यांचे देखील संधी हुकली आहे. तर माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांना देखील धक्का बसला आहे.
भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर हे गेल्या वेळेला यड्राव मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा हा मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यामुळे मतदारसंघ त्यांना गमवावा लागला. रुकड़ी मतदार संघातून निवड्न आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य पद्मावती राजेश पाटील यांना धक्का बसला. सध्या शिवसेनेत आहेत. रूकडी हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर झाला आहे.
मावळत्या सभागृहातील गारगोटी मतदारसंघातील रेश्मा देसाई, पिंपळगाव मतदारसंघातील रोहिणी आबिटकर यांना पुन्हा लढण्याची संधी आहे. रोहिणी आबिटकर ह्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बंधू अजून आबिटकर यांच्या पत्नी आहेत. मागील दोन टर्म हा मतदारसंघ त्यांच्याकडेच राहिला आहे. जिल्हा परिषदेवर पदासाठी यंदा महिला खुला असल्याने रोहिणी आबिटकर यांना संधी आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर दहाही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत राबलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी आमदारांना संघर्ष करावा लागणार आहे. यावेळी महायुतीतील भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील जागावाटप आणि उमेदवारीवरून संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, अमल महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने त्यांची ताकद जिल्हा- तालुकास्तरावर आहे. तर खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत पाटील आसगावकर हे विरोधी बाजूला आहेत. त्यामुळे पंचायत समितीवरील संघर्ष देखील वाढण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.