kolhapur zp Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP : सभापती ठरले; 'झेडपी'चे दोर आपल्याच हाती ठेवण्यात मंत्र्यांनी मारली बाजी...

Kolhapur ZP Chairman | Mahayuti Wins | Political Control : समाजकल्याण समिती सभापतिपद राजर्षी शाहू आघाडीकडे आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीचे चार सदस्य आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध सभापतींची निवड आज पार पडत आहे. या सभापती निवडीवर कोणाचे वर्चस्व राहणार, शिवाय कोणाचे नाव निश्चित होणार, यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांमध्येच रस्सीखेच निर्माण झाली होती. शेवटपर्यंत ताणून धरलेल्या चर्चेत अखेर जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी झेडपीचे दोर आपल्याच हातात ठेवले आहेत.

महायुतीच्या नेत्यांच्या सकाळी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सर्व सभापती पदाची नावे निश्चित करण्यात आली असून दुपारी दोन वाजता या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध समिती सभापतिपदासाठी नावे निश्चित झाली आहेत. बांधकाम व आरोग्य समिती सभापती पदासाठी शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती.

शिवसेनेमधीलच आमदारांमध्ये यासाठी स्पर्धा सुरू होती. आमदार चंद्रदीप नरके आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात रस्सीखेच होती. आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या मतदारसंघातील सदस्याला सभापतिपद मिळावे, यासाठी आग्रह धरला होता. करवीर तालुक्यातील वडणगे मतदारसंघातील सदस्य इंद्रनील पाटील यांच्यासाठी आग्रही होते. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हे चिरंजीव शिवाजी जाधव यांच्यासाठी आग्रही होते.

मंत्री आबिटकर यांनी त्यात बाजी मारली. बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून या पदावर भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सरिता नांदेकर यांचे नाव निश्चित केले. शिक्षण व अर्थ साठी जनसुराज्यकडून शितल प्रवीण यादव यांचे नाव निश्चत केले. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सदस्या चंदगड तालुक्यातील विद्या विलास पाटील यांना संधी मिळाली.

समाजकल्याण समिती सभापतिपद राजर्षी शाहू आघाडीकडे आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीचे चार सदस्य आहेत. या आघाडीचे अब्दुललाट मतदारसंघातील सदस्या श्रद्धा गायकवाड यांची समाजकल्याण समिती सभापतिपदासाठी नाव निश्चित केले.

महिला व बालकल्याण समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे आहे. चंदगड तालुक्याला हे पद द्यायचे नेत्यांनी निश्चित केले. मात्र या पदासाठी रचना गावडे, विद्या पाटील, सायली भोगण यांची नावे चर्चेत होती. नेते मंडळीच्या चर्चेनंतर विद्या विलास पाटील यांचे नाव निश्चित झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT