Hasan Mushrif and Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : मुश्रीफ-सतेज पाटलांच्या वादाचे नवे कारण; काँग्रेसकडून निवडून आलेल्या उमेदवारावर राष्ट्रवादीचा दावा

Hasan Mushrif vs Satej Patil : काँग्रेसकडून निवडून आलेल्या गारगोटीच्या रेश्मा देसाई यांच्यावर शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला आहे. त्यामुळे हा दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नव्या वादाचे कारण ठरू शकतो.

Rahul Gadkar

Kolhapur News, 10 Feb : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून काही ठिकाणी एकत्र असली तरी अनेक ठिकाणी भाजपच्या तर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता काँग्रेसच्या विजयी उमेदवारावर देखील दावा केला आहे.

काँग्रेसकडून निवडून आलेल्या गारगोटीच्या रेश्मा देसाई यांच्यावर शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला आहे. त्यामुळे हा दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नव्या वादाचे कारण ठरू शकतो.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडी सोबत चंदगडमध्ये आमची आघाडी असल्यामुळे शिरोळमध्ये आलेल्या चार जागा या देखील आमच्याच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे तब्बल चिन्ह 25 जागांवर आमचा विजय झाला आहे. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा पाठोपाठ त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ठाकरे सेनेचे उमेदवार माजी आमदार के. पी पाटील यांना पाठिंबा दिला होता. सध्या के. पी पाटील महायुतीत आहेत. तर राहुल देसाई काँग्रेस मध्येच आहेत.

भुदरगड तालुक्यात शिवसेना आणि भाजप एकत्र लढले असले तरी महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ यांनी गारगोटी जिल्हा परिषद मध्ये थेट काँग्रेस सोबत शिव शाहू आघाडी केली. त्यामुळे या मतदार संघातून निवडून आलेल्या राहुल देसाई यांच्या पत्नी रेश्मा देसाई या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असल्याचा दावा मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीत 18 जागा मिळवून मोठा पक्ष ठरला आहे.

तर आजरा तालुक्यातून दोन जागा या स्थानिक आघाडी करून मिळवल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी कडून करण्यात येतो. तर नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत आमदर राजेंद्र पाटील यड्रावर यांच्या राजर्षी शाहू आघाडी केली ती कायम असल्याचे सांगत शिरोळ तालुक्यात या गटाने घेतलेल्या 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्याचा दावा केला.

तर रेश्मा देसाई या देखील आपल्याच असल्याचा दावा मंत्री मुश्रीफ यांच्याकडून केला जातोय. निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांच्याकडून विजयी झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राजर्षी शाहू आघाडी आणि शिवशाही आघाडीच्या उमेदवारांचा उल्लेख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT