Pune Congress : ज्या जिल्हा परिषदेत 38 वर्ष सत्तेत तिथेच काँग्रेसचं पानिपत : एकही जागा जिंकता आली नाही!

Pune ZP Election Results 2026 : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर अनेक पुणे जिल्ह्यातील अनेक नेते आणि काही माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये पुरंदरमधील माजी आमदार आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा यामध्ये समावेश होता.
Pune Zilla Parishad Election Results 2026, marking a historic defeat for Congress in Pune ZP.
Pune Zilla Parishad Election Results 2026, marking a historic defeat for Congress in Pune ZP.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Feb : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाणारी पुणे जिल्हा परिषद सध्या पूर्णपणे काँग्रेसमुक्त झाली आहे.९ फेब्रुवारीला जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तसेच पंचायत समितीमध्येही अशीच परिस्थिती आहे.

त्यामुळे काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा परिषदेतून पूर्णपणे 'हद्दपार' झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत एकूण ७३ जागा होत्या. यापैकी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारच्या राष्ट्रवादीने तब्बल ५१ जागा जिंकून एकहाती बहुमत मिळवले. ही निवडणूक अजित पवारांच्या अकाली निधनानंतर झाली असल्याने पक्षाला सहानुभूतीचे लाटेचा फायदा झाल्याचे मानले जात आहे.

या निवडणुकीत भाजपला १० जागा, शिवसेना (शिंदे गट) ला ५ जागा, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला ६ जागा आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला १ जागा मिळाली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत २६ जागांवर उमेदवार उभे केले होते, पण सर्व ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून १९९९ पर्यंत सलग ३८ वर्षे पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते.

Pune Zilla Parishad Election Results 2026, marking a historic defeat for Congress in Pune ZP.
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का! ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर

२०१७ च्या निवडणुकीतही काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा पूर्ण शून्यावर समाधान मानावे लागले. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेसची स्थिती निराशाजनक राहिली असून, त्यांना एकही जागा मिळाली नाही. एकूण 146 जागांपैकी राष्ट्रवादीने 90 जागा जिंकल्या, तर भाजप 28 शिवसेना 12 आणि उद्धव ठाकरे शिवसेना 10 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळू शकले आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर अनेक पुणे जिल्ह्यातील अनेक नेते आणि काही माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये पुरंदरमधील माजी आमदार आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा यामध्ये समावेश होता. त्यामुळे जे नेते पूर्वी भाजपची पुणे जिल्ह्यामध्ये ताकद होते ते नेते इतर पक्षांमध्ये निघून गेले आहेत.

Pune Zilla Parishad Election Results 2026, marking a historic defeat for Congress in Pune ZP.
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का! ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर

त्यामुळे सध्याची परिस्थितीला पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे नेतृत्व करणारा एकही मोठा नेता सध्या काँग्रेसकडे असल्याचं पाहायला मिळत नाही आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानेदेखील पुणे जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये तितकं लक्ष घातल्याचे पाहायला मिळालं नाही. त्याचा एकूणच या फटका काँग्रेसला बसला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसला या पराभवाच्या आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com