Satej Patil - Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP Election: 'झेडपी'च्या निकालानंतर राजकीय वारं फिरलं, सतेज पाटील 'दोस्त' मुश्रीफांसोबत जाणार? नेमकं काय म्हणाले..?

Kolhapur ZP Election 2026 Results : कोल्हापूर झेडपीत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करत सूचक संकेत दिले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची दोस्ती राजकारणाच्या पलीकडे आहे हे राज्याला सर्वश्रुत आहे. महायुतीमुळे दोघांच्या मैत्रीत दरार आला असला तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 20 जागा घेतल्या आहेत तर त्या पाठोपाठ काँग्रेसने 15 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करत सूचक संकेत दिले आहेत.

राज्यभरात भाजपच्या विरोधात काँग्रेस कणखरपणे लढत आहे. जिल्ह्यात काँग्रेस वाढवणं माझी जबाबदारी आहे, काँग्रेसच्या विचारांचा वर्ग कोल्हापुरात आहे. अजून विधानपरिषदेचे दोन वर्ष माझी बाकी आहेत, मी पुढे कसं निवडणूक लढवणार हे आता सांगू शकत नाही, तोपर्यंत हे सरकार राहील, नाही राहील, माहीत नाही. पण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. असं सांगत सतेज पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना उत्कंठा असलेल्या विधानावर बोट ठेवलं.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रतेची जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाही. कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्रित बहुमत दिसत आहे, मात्र, ते महायुती म्हणून लढले आहेत. हसन मुश्रीफ स्वतंत्र लढले असते, तर कदाचित विचार करता आला असता. मुश्रीफसाहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले. पण त्यांनी मदत मागितली तर विचार करू, असे सूचक वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले.

काँग्रेसने जिल्ह्यात 15, स्वाभिमानी 1, शिवसेना ठाकरे गट 1 आणि शिवशाहू आघाडी 1 अशा एकूण 18 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. घवघवीत यश जरी नसले तरी प्रत्येक तालुक्यात आम्ही पोहोचलो आहोत. स्व. अजितदादांच्या निधनानंतर सहानुभूतीचा उपयोग राष्ट्रवादीला निश्चित झाला. कदाचित दादा असते तर अजून यश त्यांना मिळालं असतं,असेही सतेज पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT