Sangli ZP Election 2026: एकाचवेळी महाविकास आघाडी अन् भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम'; आमदार यड्रावकरच ठरले शिरोळचे 'बाजीगर'

Sangli ZP Election 2026: शिरोळ तालुक्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने व माजी आमदार उल्हास पाटील राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून तर माजी खासदार राजू शेट्टी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले.
Rajendra Patil Yadravkar
Rajendra Patil YadravkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकाचवेळी भाजपला आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड देत शिरोळ तालुक्याचे 'बाजीगर' ठरले आहेत. भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवता आले असले तरी, गत निवडणुकीचा स्ट्राईक रेट गमावल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकांनंतर आता भाजपच्या नेत्यांवरती आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

शिरोळ तालुक्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने व माजी आमदार उल्हास पाटील राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून, तर माजी खासदार राजू शेट्टी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले.

ऐनवेळी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजवर्धन नाईक-निंबाळकर, डॉ. संजय पाटील, सावकर मादनाईक या भारतीय जनता पार्टीच्या दिग्गजांनी जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या सात गणांवरती आपले उमेदवार उभे करून वेगळी चूल मांडली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. स्थानिक प्रश्न व गेल्या सहा महिन्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटना, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनीच मांडल्या. आमदार यड्रावकर यांनी बांधलेली मोट एकसंघ राहिली. विकासाच्या मुद्द्यावर तसेच साम, दाम, दंड,भेद या नीतीचा अवलंब करत उदगाव, नांदणी, अब्दुललाट व दतवाड या चार जिल्हा परिषदच्या जागा तसेच पंचायत समितीच्या उदगाव, अर्जुनवाड, आलास, चिपरी, अब्दुललाट, यड्राव, शिरढोण, अकिवाट, दत्तवाड व टाकळी या दहा जागा जिंकून तालुक्यावर पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले.

Rajendra Patil Yadravkar
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषदेत मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या महिला उमेदवार ठरल्या 'जायंट किलर'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दानोळी जिल्हा परिषद गट व यड्रावकरांनी जिल्हा परिषद गटावर वर्चस्व ठेवले आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघात, हिंदुत्वाचा प्रभाव पडला. दोन पटेलांच्या लढतीत, भारतीय जनता पार्टीचे प्रशांत शहापुरे यांनी कमळ फुलवले आहे

बहुचर्चित दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवार राधा उर्फ दिपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना एक वर्ष जिल्ह्यातून हद्दपारीचा झालेला आदेश राजर्षी शाहू आघाडीच्या पथ्यावर पडला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे डॉ. संजय पाटील यांच्या स्नुषा मधुमाराजे जाधव-पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दिग्गजांना, भविष्यात शिरोळ तालुक्यामध्ये राजकीय समीकरण मांडताना, आमदार यड्रावकर यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

Rajendra Patil Yadravkar
Kolhapur ZP : जिल्हा परिषदेसाठी सतेज पाटलांची साथ सोडली अन् घात झाला; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाचा पराभव

यड्रावकरांच्या करिष्म्यानं काय केलं..?

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विकास कामावर आणि बेरजेच्या राजकारणावर जनतेनं विश्वास कायम ठेवला. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या धरसोड वृत्तीला जनतेनं फटकारलं. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सावकार मादनाईक यांच्या गडाला यड्रावकरांनी धक्का दिला आहे.

नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांना धक्का दिला. यड्रावकर जिल्हा परिषद मतदारसंघात राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या गटाचे अस्तित्व धोक्यात आणले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Chandrakant Patil, Vishal Patil, Jayant Patil
Chandrakant Patil warning office bearers
Sangli jilha bank election .jpg
Solapur ZP President| Rajendra Raut | Deepak Vaidya
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com