Local Body Elections Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Local Body Election : जिल्हा परिषदमधून पाच मतदारसंघ होणार गायब! नव्या नगरपंचायत, नगरपालिकेचा परिणाम

Local Body Election Kolhapur ZP : ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपालिका, नगरपंचायतमध्ये झाल्याने जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून या गावांना वगळले जाणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आदेश देण्यात आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यातच प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील नव्या प्रभाग रचनेनुसार जुने पाच मतदारसंघ गायब होणार आहेत. जिल्ह्यात नवीन नगरपालिका आणि नगरपंचायतीत झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीतून हुपरी, आजरा, शिरोळ, हातकणंगले आणि चंदगड हे मतदारसंघ वगळण्यात येणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहात वातावरण आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारसंघाची अधिसूचना जाहीर केल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाची माहिती राज्य निवडणूक आयोगांकडून संकलित केली जात आहे.

तत्पूर्वी मागील दहा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतचे नगरपालिकेत आणि नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात यावी याची मागणी होती. त्यानुसार राज्य सरकारच्या महायुतीच्या काळात हुपरी, आजरा, चंदगड, शिरोळ, हातकणंगले या ग्रामपंचायतीचे टप्प्याटप्प्याने नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये रूपांतरित करण्यात आले होते. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे मतदारसंघ म्हणून याकडे पाहिले जात होते.

दरम्यान हुपरी वगळता हे सर्व मतदारसंघ तालुक्याच्या नावाने ओळखले जातात. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. राजकीय दृष्ट्या महत्त्वाची गावी असल्याने याकडे राजकीय नेत्यांची देखील वारंवार लक्ष होते. मात्र या गावातील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपालिका, नगरपंचायत मध्ये झाल्याने जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून या गावांना वगळले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या रचनेकडे लक्ष

शेजारील गावे ही इतर प्रमुख गावांची ओळख असलेल्या मतदारसंघांमध्ये रूपांतर होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची रचना देखील कमी किंवा मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेकडे देखील इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT