Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचे आरोप हलक्यात घेतले; म्हणाले काहीही होणार नाही!

Shiv Sena leader Sanjay Shirsat responds to Imtiaz Jaleel's allegations, dismissing them by saying "nothing will happen : आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी संजय शिरसाट जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा माध्यमांनी त्यांना इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला.
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : राज्याचे सामाजिक न्याय व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. विशेषत: एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी यात पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे. शेंद्रा एमआयडीसीतील भूखंडाचे प्रकरण बाहेर काढून शिरसाट यांच्या अडचणीत वाढ केली.

त्यानंतर काल पुन्हा शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपल्या मुलांच्या व पत्नीच्या नावे पंधरा एकरहून अधिक जमीन, प्लॉट खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप करत इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना आव्हान दिले. एवढेच नाही तर मी धमक्यांना घाबरणार नाही आणि थांबणार नाही, असा इशाराही दिला. दरम्यान या संपूर्ण आरोप आणि प्रकरणावर संजय शिरसाट यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.

आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी संजय शिरसाट जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा माध्यमांनी त्यांना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलेल्या आरोपांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र 'सोडा हो त्या इम्तियाज जलीलच्या आरोपाचे काही होणार नाही' असे म्हणत भाष्य करणे टाळले. याचवेळी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात सुरू असलेल्या 'क्या हुआ तेरा वादा' या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील जनआंदोलनावर शिरसाट यांनी टीका केली.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांचा एमआयडीसीतील प्लॉट खरेदीचा डाव इम्तियाज जलील उधळणार!

जनजागृती करतात ही चांगली गोष्ट आहे. पक्ष वाचवण्याचीही धडपड असून 'उबाठा' उद्या एमआयएम सोबत जाण्यासही मागेपुढे पाहणार नाही, अशी टीका शिरसाट यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून राज्यात सुरू आहेत.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat : 'ती' एक चूक अन् मंत्री शिरसाट पुरते घेरले गेले, पक्षातही एकाकी पडले!

मात्र आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राज ठाकरे यांची बैठक घेत या सगळ्या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यावर संजय शिरसाट यांनी 'उबाठा'वर तोंडसुख घेत त्यांना भूमिका घेता येत नाही, असे म्हणत या पक्षाची येणाऱ्या काळात वाईट अवस्था होणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com