Hasan Mushrif-Prakash Abitkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कडवे आव्हान

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यातून इतरही काही आमदारांनी महायुती सरकारच्या काळातही मंत्रिपदावर दावा केला होता. आमदार विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली होती.

Rahul Gadkar

Kolhapur, 17 December : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाल्यानंतर जिल्ह्यातील महायुतीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर, तर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना संधी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबिटकर आणि मुश्रीफ यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

आपापल्या पक्षातील नाराजी मिटवून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी या दोन नेत्यांवर असणार आहे. महायुतीमधील (Mahayuti) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळेतील पदाधिकाऱ्यांच्या सांगड घालण्याचे मोठे आव्हान या दोन नेत्यांपुढे असणार आहे. या तीन पक्षातीलच एकी स्थानिक स्वराज्य संस्थेत ही भारी पडू शकते. तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांचे एकमत टिकवणे यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेबरोबर जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक राज सुरू आहे. कार्यकाळ संपून उठल्यानंतरही साडेचार वर्षानंतर अजूनही निवडणुकीची प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वांच्या नजरा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत.

तत्पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी महापालिका उदयास आल्याने यंदाची पहिलीच निवडणूक असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारल्यानंतर जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या दोघांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात झालेल्या सत्ता बदलांमुळे सोबत आलेल्या आमदारांच्या पाठीमागे ठाम राहण्याची भूमिका नेतृत्वाने घेतली होती. ती मंत्रिमंडळ विस्तारात ही पाहायला मिळाली. मुश्रीफ यांच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार ठाम उभे आहेत, तर अबिटकर यांच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ताकद लावली आहे.

विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांचा मेळ घालत महायुतीने घवघवीत यश मिळवले. कोणत्याही क्षणी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मेळ घालणे आवश्यक आहे.

सध्या सर्वच पक्षांनी स्वबळावर तयारी केली असली तरी महायुतीतील नेत्यांनी आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही एकत्रित लढवण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या फळीतील नेत्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान मुश्रीफ आणि अबिटकर यांच्यापुढे असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महापालिका, एक जिल्हा परिषद, सात नगरपालिका, तीन नगरपंचायत, आणि बारा पंचायत समित्यांच्या निवडणुका आगामी काळात होऊ शकतात.

मंत्रिपदाच्या हुलकावणीने कुणाचा गेम होणार?

कोल्हापूर जिल्ह्यातून इतरही काही आमदारांनी महायुती सरकारच्या काळातही मंत्रिपदावर दावा केला होता. आमदार विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. भाजपकडून आमदार अमल महाडिक हेदेखील प्रयत्नांत होते. मात्र, त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार, हे देखील पाहणी महत्वाचे आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT