Sanjay Shirsat : मंत्री होताच संजय शिरसाट हिशोब चुकता करणार! सत्तारांवर सोडला बाण..

Sanjay Shirsat Target Abdul Sattar in Political Rivalry : मूळच्या शिवसैनिक असलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये हस्तक्षेप करण्याचे काम सत्तार यांच्याकडून सुरू होते. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासह अनेक आमदार नाराज होते.
Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटपदी वर्णी लागताच संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर बाण सोडला आहे. जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्याची सुरुवात आपण सिल्लोड पासून करणार असल्याचे संजय शिरसाट यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले. जिल्ह्याच्या राजकारणात 'काना मागून आला अन् तिखट झाला', अशीच काहीशी परिस्थिती अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झाली होती.

जाहीरपणे 'मी सच्चा शिवसैनिक नाही, तर माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रसंगी करार झाला', असल्याचे सांगणाऱ्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यामुळेच संजय शिरसाट यांची शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी हुकली होती. शिरसाट यांच्या मंत्रिपदा आड कायम सत्तार येत असल्याने आता संधी मिळताच शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन महिन्याच्या पालकमंत्री पदाच्या काळात अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्येही जिल्ह्यातील इतर आमदारांच्या मतदारसंघावर अन्याय केल्याची ओरड होत होती.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Abdul Sattar News : जुनी प्रकरणं नव्याने समोर ; अब्दुल सत्तारांचा पाय खोलात!

यावर अद्याप पालकमंत्री पद कोणाला मिळणार? हे स्पष्ट नसताना शिरसाट यांनी आपणच पालकमंत्री होणार असे संकेत देत मागच्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांना दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे समान वाटप गेल्या काळात झाले नव्हते. मात्र आपण या निधीचे समान वाटप करणार, असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Shivsena : तानाजी सावंत, दीपक केसरकरांना तब्बल पाच तास वेटींग, एकनाथ शिंदेंनी भेट नाकारली?

भाजपमध्ये कडाडून विरोध झाल्यामुळे राजकीय अपरिहार्यता म्हणून सत्तार यांनी त्यावेळी नाईलाजाने 'धनुष्यबाण' हाती घेतला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे नाराज असलेल्या सत्तार यांना एकनाथ शिंदेंनी बंड पुकारले तेव्हा हिरारीने पुढाकार घेत शिवसेना फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय मूळच्या शिवसैनिक असलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये हस्तक्षेप करण्याचे काम सत्तार यांच्याकडून सुरू होते.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडणार वर्षा बंगला; कोणता नवा बंगला मिळणार?

त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासह अनेक आमदार नाराज होते. मात्र एकनाथ शिंदे यांचा विश्वास संपादन करत सत्तार यांनी या सगळ्या सच्चा शिवसैनिकांवर कुरघोडी केली. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांची वर्णी लागणार असताना अब्दुल सत्तार यांनी शिंदे यांच्या बंगल्यावरच राडा घातला. यावेळी शिरसाट आणि सत्तार यांच्यात बाचाबाची झाल्याच्या बातम्याही त्यावेळी माध्यमांमध्ये आल्या होत्या.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या वर्चस्वाला अखेरच्या क्षणी दिल्लीचा लगाम अन् संतुलन बिघडले!

मंत्रिमंडळात शपथविधीसाठी कुटुंबासह मुंबईत दाखल झालेल्या संजय शिरसाट यांना सत्तार यांच्यामुळेच ऐनवेळी डावलण्यात आले. याशिवाय संदिपान भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि मंत्रीपद शिरसाट यांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांनी बाजी मारत पालकमंत्री पटकावले होते.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Mahayuti Government : अजित पवार, फडणवीस यांच्यातील ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावे यासाठी अब्दुल सत्तार यांनी संदिपान भुमरे यांना आपल्या बाजूने वळवले होते. तेव्हापासून शिरसाट यांचे भुमरे आणि सत्तार यांच्याशी असलेले संबंध कमालीचे बिघडले. मात्र 'श्रद्धा आणि सबुरी' बाळगत संजय शिरसाट यांनी योग्य संधीची वाट पाहिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. आता जिल्ह्याचे पालकमंत्री पद पटकावून जुने हिशोब चुकते करण्याची तयारी संजय शिरसाट यांनी आतापासूनच सुरू केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com