Krishna Sugar Factory Election sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Krishna Sugar Factory Election : कृष्णाकाठ पुन्हा पेटणार! कृष्णा कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, सातारा-सांगलीच्या राजकारणाची दिशा ठरणार

Krishna Factory Election Satara Sangli Politics : राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणऱ्या कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे नवीन जोडण्या होणार की स्वबळावर नेते ताकद दाखवणार याची चर्चा सुरू झाली आहे.

हेमंत पवार

Cooperative Elections : राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार १८ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे तर २१ जुनला मतदान होणार असल्याची माहिती कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी आज दिली.

सातारा व सांगली या दोन जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणुक दरवेळी राज्यात गाजते. कृष्णाकाठचे राजकारणच प्रत्येक निवडणुकीत बदलत असल्याने त्याची राज्यभर चर्चा होते. २०२१ साली सातारा, सांगली अशा दोन जिल्ह्यात कृष्णा कारखान्याची ४७ हजार १४५ एवढी सभासद संख्या होती.

कृष्णा कारखान्याच्या २९ जुन २०२१ रोजी झालेल्या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे जयवंतराव भोसले यांचे सहकार पॅनेल, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल निवडणुकीस सामोरे गेले होते.

मागील निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणून निवडणुक लढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी बोलवलेल्या बैठकीत बोलणी फिस्कटल्याने कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल अशी दोन पॅनेल स्वतंत्र लढली.

अ‍ॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी त्यावेळी संस्थापक पॅनेलला, माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी रयत पॅनेलला साथ दिली. त्यावेळी जोमात असलेल्या कॉंग्रेसचीच मतविभागणी झाल्याने त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि सत्ताधारी डॉ. भोसले यांच्या जयवंतराव भोसले पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखत २१ पैकी २१ जागा जिंकल्या तर विरोधी आघाडीच्या पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही.

सध्या कारखान्यासाठी भोसले गटासह अविनाश मोहिते यांच्या गटानेही तयारी सुरु केली आहे. दोन आठवड्यापुर्वी मतदार याद्या अंतीम झाल्या होत्या. त्यानंतर निवडणुक निर्णय़ अधिकारी म्हणून अर्पणा यादव यांची नियुक्ती सहकार विभागाकडुन करण्यात आली.

23 जूनला निकाल

दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले जाणार आहे. कारखान्यासाठी ५० हजार २५२ मतदार असुन निवडणुकीसाठी १८ मे २२ मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

दाखल झालेले अर्ज २६ मे ९ जुन दरम्यान मागे घेण्याची मुदत आहे. २१ जुनला मतदान होणार असुन २३ जुनला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय़ अधिकारी यादव यांनी सांगीतले. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता कृष्णाकाठी वातावरण चांगलेच तापणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT