Pune MLC election : विधानपरिषदेचा धुरळा : पुण्यात 'स्थानिकच्या' गणितात भाजप, राष्ट्रवादीतच चुरस : महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच

Pune local authority constituency News : स्थानिकच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर संख्याबळ अधिक असल्याने भाजपचा डोळा दिसत आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच इच्छुक तयारीला लागले आहेत.
Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
DCM Sunetra Pawar, CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गत 4 वर्षांपासून रखडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांतून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. ही जागा तांत्रिकदृष्ट्या ६ डिसेंबर २०२२ पासून रिक्त होती. मात्र, गेल्या ४ महिन्याच्या काळात पुणे जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक पार पडल्या आहेत. त्यामुळे लवकरच विधानपरिषदेचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीमधील मित्रपक्षात आतापासूनच जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर संख्याबळ अधिक असल्याने भाजपचाही डोळा दिसत आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच इच्छुक तयारीला लागले आहेत.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा आतापर्यंत इतिहास पाहिला, तर या जागेवर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणानुसार भाजपनेही येथे पाय घट्ट रोवले आहेत. त्यामुळे येत्या काळात जागावाटपात ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदार संघातून १९९८-२००४ दरम्यान काँग्रेसचे शरदचंद्र रणपिसे आमदार होते. तर पिंपरी-चिंचवडमधील दिग्गज नेते स्व. लक्ष्मण जगताप यांनी २००४ मध्येही निवडणूक अपक्ष लढवून जिंकली होती.

त्यानंतरच्या काळात २०१० व २०१६ या सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या आमदारकीची मुदत ६ डिसेंबर २०२२ ला संपली. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने ही जागा रिक्त होती. आता पुणे जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
Baramati By-Election: काय होईल बारामतीत? महाराष्ट्रातील राजकीय आघाड्यांचे पोपट मेले आहेत...

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी एकूण ८१० सदस्यांचे मतदान असणार आहे. त्यामध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस ३४४, भाजप ३०५ आणि शिवसेना ६८ असे महायुतीचे एकूण ७१७ सदस्य आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ११, काँग्रेस १९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार १७ असे एकूण ४७ संख्याबळ आहे. त्याशिवाय अपक्ष २३ तर स्थानिक आघाडीचे २३ सदस्य आहेत.

नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक

बारामती, इंदापूर आणि जुन्नर, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ, चाकण, राजगुरूनगर, मंचर, देहू, आळंदी, दौंड, खेड आणि हवेली, जेजुरी, भोर सासवड आणि शिरूर नगरपालिका व नगरपंचायतीमधील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस २१९, भाजप ९०, शिवसेना ५५, काँग्रेस ४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ११, बसप १, रासप १, स्थानिक आघाडी २४, अपक्ष २७ असे एकूण ३९४ सदस्य आहेत.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
Maharashtra MLC Election : महायुती-मविआची विधानपरिषदेसाठी तिरपी चाल; उमेदवारांच्या नावांची घोषणा मुद्दामहून रोखली? पुढील तीन दिवसांत कुणाचं नशीब फळफळणार ?

पुणे जिल्ह्यातील झेडपी व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस ५१, भाजप १०, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ०६, शिवसेना ०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ०१ असे ७३ सदस्य आहेत. या निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या सभापतीला मतदानाचा अधिकार असतो. पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या आहेत. बहुतांश ठिकाणी महायुतीची सत्ता असली तरी ११ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती आहेत. तर भाजपचे दोन ठिकाणी सभापती आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पक्षनिहाय संख्याबळ

पुणे महानगरपालिकेत भाजप (BJP) ११९,राष्ट्रवादी काँग्रेस २७, काँग्रेस १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ०१, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ०३ असे एकूण १६५ सदस्य आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप ८४, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ३७, शिवसेना ०६, अपक्ष ०१ असे एकूण १२८ सदस्य आहेत.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
Maharashtra MLC election : विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! भाजपच्या एका निर्णयाने समीकरण बदलणार, दिल्लीतून पुन्हा राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्र ?

पुण्यात इच्छुकांची मांदियाळी

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. संख्याबळानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातही ही जागा कोणाला सुटणार? या नंतर उमेदवार ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष या वाटाघाटीकडे लागले आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com