Maratha Reservation  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : कोल्हापुरात आढळल्या 5,566 कुणबी नोंदी, मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदींचा अंदाज

Mangesh Mahale

Kolhapur : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतलेले आहे. त्याचे काम जिल्हापातळीवर सुरू झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तालुका स्तरावर नेमण्यात आलेल्या समितीकडून कुणबीची नोंद घेण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात 5 हजार 566 नोंदी सापडल्याची नोंद आहे. यातील सर्वाधिक नोंदी या कागल व करवीर तालुक्यांतील आहेत. मराठवाङ्यापेक्षा जास्त कोल्हापूर जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज आहे.

कुणबी नोंदी शोधासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्व तहसील कार्यालयांसह कोल्हापूर पुरालेखागार कार्यालय व कळंबा कारागृहातील नोंद वहीमध्येही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. कुणबीच्या सर्वाधिक नोंदी या महसूलकडेच असणार आहेत. त्यामुळे तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह जेलचे पोलिस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी अशा वेगवेगळ्या गटांतील सर्व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत.

पहिल्या दिवशी एकही नोंद नाही

जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचे काम सुरू झाल्यानंतर कागल तालुक्यात सर्वाधिक सापडले आहेत. मात्र, चंदगड आणि शिरोळ तालुक्यांत पहिल्या दिवशी एकही नोंद सापडली नाही. पुढे आणखी काही दिवस यांचा शोध घेतला जाणार आहे. मराठावाड्यापेक्षा अधिक कुणबी नोंद असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आढळून आलेल्या नोंदी

  • कागल- 1185

  • करवीर- 1104

  • भुदरणड- 992

  • आजरा- 719

  • पन्हाळा- 600

  • हातकणंगले- 432

  • राधानगरी- 271

  • गगनबावडा- 152

  • नगरपालिका- 95

  • पुरालेखागार- 8

  • गडहिंग्लज- 5

  • कळंबा कारागृह- 3

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT