Dilip Walse Patil: मराठा आरक्षण लढ्याचा फटका वळसे पाटलांना; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत...

Maratha Reservation : सकल मराठा समाजाने या कार्यक्रमास तीव्र विरोध केला आहे.
Dilip Walse Patil:
Dilip Walse Patil:Sarkarnama
Published on
Updated on

Manchar : मराठा आरक्षणाच्या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते (अजित पवार गट) दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील मंचर बस स्थानकाचे उद्घाटन वादात सापडले आहे. ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थिती या बस स्थानकाचे उद्घाटन होणार आहे, पण सकल मराठा समाजाने या कार्यक्रमास तीव्र विरोध केला आहे.

"पहिलं आरक्षण मगच उद्घाटन" अशी थेट भूमिका घेत राज्याच्या प्रमुख नेत्यांना कार्यक्रमस्थळी काळे झेंडे दाखवून अपमान करण्याचा इशारा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी दिला आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघातील मंचर बस स्थानक सात वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना उद्घाटनप्रसंगी वादात सापडले आहे.

Dilip Walse Patil:
Maratha Reservation: 'कार्तिकी'साठी उपमुख्यमंत्री नको; पंढरपुरात मंदिर समितीची बैठक उधळली..

मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. आतापर्यंत तीनदा मुहूर्त हुकल्यावर हे शिष्टमंडळ आज छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहेत. या भेटीत शिष्टमंडळाकडून जरांगे यांना टाइम बॉन्ड दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यातील आजची भेट महत्त्वाची समजली जात आहे.

हे शिष्टमंडळ थेट मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल होणार आहे. तेथून जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतील. चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Dilip Walse Patil:
Sangamner Jail: आरती म्हणत म्हणत, गज कापले, चौघा सराईत गुन्हेगारांचे पलायन

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये समिती सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

महायुतीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंढरपूरला कार्तिकी एकादशीला पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, की उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळणार यावरून नवा पेच निर्माण झाला आहे.

Dilip Walse Patil:
Ranjit Taware: जिल्हा बँकेच्या संचालकपदी अजितदादांचे निकटवर्तीय रणजीत तावरे यांची निवड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com