Ekanth Shinde, Dr. Bharat Patankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation News : कुणबीचे पुरावे सरकारकडेच; हा तर समाजाला झुलवण्याचा प्रकार : डॉ. पाटणकर

Umesh Bambare-Patil

Maratha Reservation News : मराठा समाज कुणबी असल्याचे १९३१ पूर्वीच्या सर्वच जनगणना व गॅजेटमध्ये नमूद आहे. राजे घराणी वगळता सरसकट मराठा समाज कुणबी असल्याचा सर्वात ठोस पुरावा सरकारकडेच असताना कुणबीचे पुरावे मागण्याचे सरकार नाटक करत आहे. या ठोस पुराव्याच्या आधारे सरसकट मराठा समाजाला कुणबी घोषित करून हा वाद एका दिवसात मिटवता येईल. मात्र, सर्वांनाच झुलवत ठेवण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत, असा आरोप डॉ. भारत पाटणकर यांनी केला आहे.

डॉ. भारत पाटणकर Bharat Patankar म्हणाले, शेती करणाऱ्या माळी, धनगर व मराठा शेती करणाऱ्या या तीन जाती कुणबीच असल्याचे महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात नमूद आहे, तर १८८१ ते १९३१ या पारतंत्र्यातील जनगणना या जातीनिहाय केलेल्या आहेत. त्यामध्येही मराठा कुणबी Maratha Reservation असल्याचे नमूद आहे.

मुंबई राज्याच्या गॅझेटमध्येही मराठा हाच कुणबी असल्याचे नमूद आहे. त्यावेळचे सर्व गॅझेट आजही दरवर्षी शासन प्रसारित करत असते. मात्र, १९३१ नंतर हळूहळू कुणबी शब्द कमी कमी होत गेला आणि फक्त मराठा राहिला. आजही एका भावकीत एखाद्या घराकडे कुणबीचा दाखला किंवा पुरावे आहेत, मग त्याच भावकीतील इतर घरे आली कोठून, असा सवालही त्यांनी शासनाला केला.

१८८१ च्या गॅझेटनुसार सातारा जिल्ह्यात एक लाख ९३ हजारवर कुणबींची संख्या होती. ती लोकसंख्या वाढून आज ती कितीपट झाली असेल, मग अशा अनेक पुराव्यांचे ऑफिशियल रेकॉर्ड सरकारकडेच असताना पुरावे मागण्याचे नाटक कशासाठी. शासन दरबारी असलेल्या ठोस पुराव्याच्या आधारे २ टक्के राजे घराणी वगळता सरसकट मराठा समाज कुणबी असल्याचा जीआर काढावा, अशी मागणी त्यांनी केली. Maharashtra Political News

४० दिवसांची मुदत देऊनही सरकार काहीही करत नाही, उलट त्यांच्याकडील ठोस पुरावे सोडून चुकीचे मार्ग दाखवत आहेत. यामुळे जरांगे पाटलांचा जीव व मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास याचा परिणाम भयानक असेल. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. यावर लवकर निर्णय न घेतल्यास आम्हीही जरांगे पाटलांबरोबर रस्त्यावर उतरू, असा इशाराही डॉ. पाटणकर यांनी दिला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT