Manoj Jarange Patil : मराठ्यांची पोरं मोठं होऊ नये म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र..; जरांगेंचा गंभीर आरोप !

Manoj Jarange Patil PC : ...तर मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलंच नसतं.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषण आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे यांनी उपोषणात पाणी, औषध, सलाइन, वैद्यकीय उपचारांचाही त्याग केला आहे.

एकीकडे प्रकृती खालावली असताना त्यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आहे. मराठ्यांची पोरं मोठे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी षडयंत्र रचल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Hunger Strike : उपोषणाचा तिसरा दिवस; तब्येत खालावली तरी पाणी घेण्यास नकार...

जरांगे पाटील म्हणाले, "पंतप्रधान जाणीवपूर्वक आरक्षणवार बोलले नाही का? एक तर त्यांना हा विषय सरकारमधल्या नेत्यांनी सांगितलं नसेल किंवा त्यांनी सोयीस्करपणे आरक्षण हा विषय टाळला असेल. पंतप्रधानांना गरिबांची गरज राहिली नाही, असा त्यातून अर्थ निघतोय. पण त्यांनी विषय घेतला नसला तरी मराठ्यांना काही फरक पडत नाही.

मात्र कुठेतरी पंतप्रधान हा विषय घेतील, असा मराठ्यांना वाटत होतं. कारण आमच्या मनात काही पाप नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात वाईट भावना असती, तर मराठ्यांनी मोदींचं विमान उतरू दिलं नसतं. पण तरीही पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हा विषय नक्की हाताळतील अशी आशा होती, पण आता त्यांना गोरगरिबांची गरज राहिली नाही. "

Manoj Jarange Patil
NCP Thane News : शरद पवार गटातील 'त्या' पदाधिकाऱ्यांची परांजपेंनी नावे केली उघड; 'यांना माणसंही...'

"सरकारने आमच्याकडून ३० दिवसांचा वेळ मागितला होता, आम्ही ४० दिवसांचा दिला. पण यांना आरक्षण जाहीर करणं होणारच नव्हतं, तर यांनी वेळ नव्हतं घ्यायला पाहिजे. खरंतर यांनी ५० वर्षांचा वेळ मागितला पाहिजे होता. मराठ्यांचे पोरं मोठं होऊ नये , म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलंय, अशी शंका मराठा समाजाच्या मनात आहे," असे मनोज जरांगे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com