Laxman Mane Pramod Ingale, satara
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : सावरकरांबाबत भाजपच्या कृतीच्या निषेधार्थ लक्ष्मण माने यांचे साताऱ्यात उपोषण

Laxman Mane भारतीय जनता पक्षाने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केल्याने या यात्रेचा निषेध त्यांनी केला असून साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी एक दिवसीय लक्षणीय उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : सावरकर हे राष्ट्रद्रोही असून त्यांची खोटी प्रतिमा उभी केल्याच्या निषेधार्थ माजी आमदार लक्ष्मण माने Laxman Mane यांनी आज (शुक्रवार) साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar यांच्या पुतळ्याशेजारी लक्षणीय उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

सावरकर यांच्या पत्रात माफीनामा असल्याने त्यांनी शरणागती मागितली होती. त्यामुळे सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक नसून राष्ट्रदोही आहेत. तरी देखील भाजप राज्यभरात सावरकर यात्रा काढत आहे. इतिहासाची मोडतोड करून तो लोकांसमोर मांडण्याची परंपरा ब्राम्हणांची सुरू आहे, अशी टीका माजी आमदार माने यांनी केली आहे.

सावरकर हे राष्ट्रद्रोही असून त्यांची खोटी प्रतिमा उभी केल्याच्या निषेधार्थ आमचे हे उपोषण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केल्याने या यात्रेचा निषेध त्यांनी केला असून साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी एक दिवसीय लक्षणीय उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.

सावरकर हे राष्ट्रभक्ती नसून राष्ट्रद्रोही होते, असे माने यांनी सांगत सावरकरांनी शिवरायांबद्दल अवमानकारक लेखन केले असून सावरकरांनी ब्रिटिशांना सहा पत्रे लिहिली होती. ते ब्रिटिशांची ६० रुपये पेन्शन घेत असल्याची टीका माने यांनी केली आहे. आंदोलनात त्यांच्यासोबत भरत लोकरे व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT