Kolhapur District Bank
Kolhapur District Bank sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक परिणाम : कोल्हापुरातील नेत्यांचे तुझ्या गळा, माझ्या गळा...

सुनील पाटील : सरकारनामा

कोल्हापूर : विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council) बिनविरोध होताच कोल्हापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (Kolhapur District Bank Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी दिग्गजांनी आपले अर्ज दाखल केले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही अनेक जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अर्ज दाखल होत असताना जिल्हा बॅंक बिनविरोध करण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत.

विधान परिषदेसाठी टोकाची इर्षा असणाऱ्या उमेदवारांची निवडणूक बिनविरोध झाली. तर कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक बिनविरोध होण्यात अशक्‍य काहीच नाही, अशी अपेक्षा आमदार प्रकाश आवाडे यांनी आज व्यक्त केली. आमदार आवाडे यांनी जिल्हा बॅंकेसाठी बॅंका, पतसंस्था आणि प्रक्रिया गट अशा दोन गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आवाडे म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक बिन विरोध होईल. याबद्दल सध्या काहीही सांगता येत नाही. याला बरेच पैलू आहेत. कोणाच्या सांगण्यावर कोणचा उमेदवारी अर्ज येतो, हे समजत नाही. तरीही, संघर्षाविना निवडणूक व्हावी हाच आमचा प्रयत्न राहिल. जिल्हा बॅंकेची निवडणूक म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रातिनिधीक संस्थेची निवडणूक आहे. सर्वसमावेशक प्रशासन असावे. अशी सर्वांचीच भावना आहे, असे आवाडे यांनी सांगितले.

सर्व नेते याचा विचार करतील. तो निर्णय आम्ही निश्‍चित घेवून. त्यांनी केलेल्या सुचनेनूसार आम्ही फॉर्म भरत आहे. जिल्ह्यातील इतर नेते, राजकीय पक्षांची निर्णय घेवून बोर्ड कसे असावे हे ठरवले जाईल. ज्या-त्या तालुक्‍यातील प्रतिनिधी कोण-कोण येणार हे ठरवले जाईल. असे आत्तापर्यंतचे नियोजन आहे. तालुक्‍यातील जागा आणि उमदेवारांची एकत्रित येतील. शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले जाईल. पुढील निर्णय एकत्रित बसून होईल. यात जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आवाडे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT