सोमय्यांची 31 डिसेंबरची डेडलाईन; 4 मंत्र्यांचे 12 घोटाळे बाहेर काढणार!

अनेक मंत्र्यांच्या मागे केंद्रीय संस्थांचा ससेमिरा लागला आहे.
 Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

अमरावती : भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर विविध आरोप केले आहेत. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या मागे केंद्रीय संस्थांचा ससेमिरा लागला आहे. त्यातच आता सोमय्या यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ४० घोटाळे जनतेसमोर आणणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी सोमय्या म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. 28 मोठे घोटाळे मी बाहेर काढले आहेत. आता 31 डिसेंबर रोजी 40 घोटाळे जनतेसमोर आणणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.

 Kirit Somaiya, Uddhav Thackeray
राष्ट्रवादीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; दीपक पवारांचे, कल्याण काळेंवर गंभीर आरोप

सोमय्या म्हणाले, चार मोठ्या मंत्र्यांच्या तक्रारी मी विविध संस्थांकडे केल्या आहेत. त्यामध्ये दोन शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यापैकी एक मुख्यमंत्री मित्र परिवारातील सदस्य आहेत. त्यामध्ये विदर्भातील काँग्रेसच्या एका मंत्र्याची फाईल आहे. तर एक मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे आता सोमय्यांच्या रडारवर असलेले हे मंत्री कोण आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.

सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घोटाळ्यांवरही भाष्य केले. उद्या मी जालन्यात जाणार आहे. अर्जुन खोतकरांच्या साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर आला आहे. एमपीएमसी घोटाळ्याची अधिक माहिती जालन्यात देणार आहे. या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक झाली आहे. त्याची सविस्तर माहितीच देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

 Kirit Somaiya, Uddhav Thackeray
किरीट सोमय्यांनी अमरावतीतून कुणावर लावला निशाणा ?

हिंदूत्वावर हल्ले सहन करणार नाही

हिंदूत्वावर होणारे हल्ले भाजप कदापिही खपवून घेणार नाही. हल्ले झालेच तर त्यासाठी ठाकरे सरकार जबाबदार असेल. 12 नोव्हेंबरला निघालेल्या मोर्चांची सखोल चौकशी व्हायला हवी. न घडलेल्या घटनेच्या अफवा कोणी पसरविल्या, याचा शोध लागला पाहिजे. सरकारमधले मंत्री 12 तारखेवर बोलत नाही. भाजपशी विश्वासघात करणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किमान हिंदूत्वाचा तरी घात करू नये, अशी टीका त्यांनी मुख्यंत्र्यांवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com