Sangamner Bazar Samiti Results
Sangamner Bazar Samiti Results Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangamner Bazar Samiti Results : संगमनेरचा गड थोरातांनी राखला; विखेंना धक्का

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Market Committee Election News : संगमनेर बाजार समितीत तिसऱ्या फेरीतही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या (Balasaheb Thorat) पॅनलची आघाडी आहे. तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे 3 तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

18 पैकी 11 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यातील 10 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, अद्याप त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. उर्वरित 7 जागांची मतमोजणी सुरू आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. आज त्या अनेक बाजार समित्यांची निवडणूक निकाल जाहीर होत आहे. त्यामध्ये आता पर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये थोरात यांनी आघाडी घेतली आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमध्ये आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलमध्ये जोरदार चुरस होण्याची होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सध्या तरी येथे थोरात गट आघाडीवर आहे. त्यामुळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजी थोरात यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT