Mahadev Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadev Jankar News : लोकसभेच्या ५, विधानसभेच्या २५ जागा सोडा; अन्यथा सर्व पर्याय खुले : जानकरांचा भाजपला इशारा

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur News : भारतीय जनता पक्षाने आम्हाला (राष्ट्रीय समाज पक्ष) लोकसभेच्या पाच, तर विधानसभेच्या २५ जागा सोडल्या तरच आम्ही त्यांच्यासोबत राहू. नाही तर त्यांचं आमचं वेगळं असेल. आम्हाला कोणीही अस्पृश्य नाही, आम्हाला पवार-ठाकरेंसह सर्व पर्याय खुले आहेत. तसेच आम्ही स्वतंत्र लढण्याचीही तयारी केली आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिला. (Leave 5 Lok Sabha, 25 Legislative Assembly seats; Otherwise all options open : Jankar's ultimatum to BJP)

राष्ट्रीय समाज पक्षाच्या (RSP) वतीने जनस्वराज्य रॅलीचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात पंढरपुरातून (Pandharpur) करण्यात आली. त्यानंतर जानकर (Mahadev Jankar) हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपला गर्भित इशारा दिला.

जानकर म्हणाले की, आम्ही आजही एनडीएमध्येच आहोत. भाजपकडून जुन्या मित्रांना दुखवायचा प्रश्नच नाही. पण, आपणही त्यांच्यावर किती अवलंबून राहायचं, याचाही आम्ही विचार केला पाहिजे. आपलही ताकद वाढली पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहेात. भाजपच्या खेळीमुळे घराणेशाही संपत चालली आहे. छोट्या पक्षांना संधी मिळत आहे.

अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यांच्या निर्णयावर आपण बोलणं योग्य नाही. अजित पवारांना सोबत घेणं, भाजप नेतृत्वाला योग्य वाटलं असेल, त्यामुळे त्यांना घेतलं असेल. आपण दुसऱ्याच्या जिवावर मालक बनण्यात मजा नाही. आपण आपल्या ताकदीवर मोठं व्हावं, एवढं मला समजतंय. त्यामुळे मतदारसंघात ताकद वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे. चांगले लोक आणि चांगले पक्ष सत्तेत आले पाहिजेत, ही भूमिका आम्ही घेऊन चाललो आहोत, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

जानकर म्हणाले की, भाजपने आम्हाला अपेक्षित जागा न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहोत. आम्हाला आमचा पक्ष देशातच मोठा करायचा आहे, ही भूमिका ठेवून मी वाटचाल करीत आहे. मला महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच जागा पाहिजेत. महाराष्ट्राबाहेर आम्ही एनडीएमध्ये नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्र असून आम्ही स्वबळावर उमेदवार उभे करणार आहोत. महाराष्ट्रात आम्हाला परभणी, माढा, बारामती, ईशान्य मुंबई आणि सांगली या लोकसभेच्या पाच जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT