Indapur Politic's : ...तर अजित पवारांनाही सत्कारासाठी इंदापुरात आणू; इंदापूरच्या उमेदवारीबाबतही हर्षवर्धन पाटील यांचे भाष्य

पूर्वी डबल इंजिन असलेले सरकार आता ट्रिपल इंजिन झाले आहे.
Harshvardhan Patil-Ajit Pawar
Harshvardhan Patil-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Indapur News : पंतप्रधन नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करत अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत. तुमची (पत्रकारांची) इच्छा असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही इंदापूरमध्ये सत्काराला आणू, तसेच आमदार दत्तात्रेय भरणे हे आता आमच्याबरोबर काम करणार आहेत, असे विधान भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. (...Then Ajit Pawar will also be brought to Indapur for felicitation: Harshvardhan Patil)

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, पूर्वी डबल इंजिन असलेले सरकार आता ट्रिपल इंजिन झाले आहे. सबका साथ सबका विकास या भावनेतून इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासह या सरकारचा जास्तीत जास्त फायदा तालुक्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच, श्रेयवादाच्या वादात राहण्यापेक्षा विकासावर भर देऊ

Harshvardhan Patil-Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajitdada : शरद पवार की अजितदादा...?, भावनाविवश राष्ट्रवादी आमदाराची निवडणूक न लढविण्याचीच मानसिकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करतो. या सरकारच्या माध्यमातून इंदापूर शहर आणि तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Harshvardhan Patil-Ajit Pawar
Walse Patil's Challenge to : ‘त्यांनी एकदा नशीब आजमावून पाहावे...’ ; वळसे पाटलांनी कुणाला दिले चॅलेंज?

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्मयोगी कारखान्यासाठी १५० कोटी व निरा भिमा कारखान्यासाठी ७५ कोटी रुपयांची निधी उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर इंदापूर दूध संघ जोमात सुरू असून दैनंदिन ९२ हजार लिटर दूध संकलन केले जात आहे. या माध्यमातून दर १० दिवसाला तब्बल १५ कोटी रुपये पशुपालक शेतकऱ्यांना मिळत आहेत.

Harshvardhan Patil-Ajit Pawar
Walse Patil Offer to Rohit Pawar : मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबेगावमधून उभे राहा; वळसे पाटलांनी दिली होती रोहित पवारांना ऑफर

या ट्रीपल इंजितन सरकारच्या माध्यमातून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४५ जागा तसेच विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे प्लस जागा जिंकण्याचं भाजपचे उद्दिष्ट असून यासाठीच महायुती करण्यात आली आहे. इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीबाबत पाटील म्हणाले की, भाजपमध्ये लोकसभा असो की विधानसभा उमेदवारी बाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेत असते, यामुळे महायुती करत असताना नेतृत्वाने नक्की याचा विचार केला असेल. येणाऱ्या काळात याबाबत समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com