Leopard Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री गडाखांच्या वस्तीत शिरला बिबट्या : वन विभागाचे दुर्लक्ष

विनायक दरंदले

सोनई ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यात दर उन्हाळ्या प्रमाणे यंदाही बिबट्यांची दहशत सुरू झाली आहे. राज्यातील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या सोनईतील ( ता. नेवासे ) वस्तीत तीन बिबट्यांचे दर्शन नागरिकांना झाले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ( Leopards in the Gadakh area: Neglect of Forest Department )

लोहगाव रस्त्याच्या बाजूला राहत असलेल्या जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या वस्तीच्या परिसरात एक मादी बिबट्या व दोन मोठे बछडे अनेकांच्या नजरेत पडले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असुन वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

या भागात मागील वर्षी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. तसेच मागील वर्षीच एका उसाच्या शेतात तीन, आठ ते पंधरा दिवसांचे बछडे सापडले होते. जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी याबाबत दुजोरा दिला असुन त्यांनी स्वतः बिबट्या व साधारण एक वर्षाच्या दोन बछाड्यास बघीतले असल्याचे सांगितले.रात्री व पहाटे एकट्याने शेतात फिरु नये, असे आवाहन गडाख यांनी केले.

गडाख वस्तीसह भवारवस्ती, राशिनकर वस्ती येथील अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या एका शेतातून दुसऱ्या शेतात मादी बिबट्या व दोन मोठे बछडे जाताना बघीतले आहेत. रात्री व सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान बिबट्या दिसल्याचे अनेकांनी सांगितले. वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT