MP Ranjitsinh Naik Nimbalkar
MP Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मला युक्रेनमध्ये जाऊ द्या : भाजप खासदाराची मोदींकडे मागणी

सरकारनामा ब्युरो

फलटण : युक्रेन व रशियात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरीकांना सुरक्षित परत आपल्या देशात आणण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळात सदस्य म्हणून जाण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

केंद्र सरकारला केलेल्या मागणीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले की, युक्रेन आणि रशियामधील सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी परतावे लागत आहे. त्यांना स्वदेशी सुरक्षितपणे परत आणण्याची जास्त काळजी वाटते, असे सांगून खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे.

सर्व भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून माझी इच्छा आहे. मी घटनास्थळी पोहोचून तेथील शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी देश प्रथम आहे, देश पुन्हा नाही. तरी भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी.

भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये परत आणण्याच्या या उदात्त कार्यात सेवा रूपाने काम करण्याची मला देण्यात यावी. युक्रेनमध्ये पोहचल्यानंतर देशातील या तरुण नागरिकांना मदत करण्यासाठी तन, मन आणि धनाने प्रयत्न करू शकेन. सरकारी अधिकारी आणि यंत्रणांना शक्य तितक्या आणि शक्य तितक्या सक्रियपणे परत आणण्यासाठी मदत करण्याची माझी इच्छा आहे. देशाची सेवा करण्याची संधी जर मला दिली तर मी लोकप्रतिनिधी या नात्याने देशाची सेवा करिन, असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT