सातारा ः खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस असून आज ते साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावरून एक मोठी घोषणा करणार आहेत. एका सामाजिक प्रश्नांबाबत प्रशासकिय बदलांसाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. पण, त्यात त्यांना यश आलेले नाही. या सामाजिक प्रश्नावर खासदार उदयनराजे यांनी काही दिवसांपासून चिंतन करून याचे उत्तर शोधताना स्वतःच एक वेगळी यंत्रणा उभी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे उदयनराजे कोणती घोषणा करणार याची उत्सुकता सामाजिक व राजकिय वर्तूळात निर्माण झाली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून या निमित्त त्यांच्या समर्थकांनी व सातारकरांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून विविध कार्यक्रम होत आहेत. यामध्ये बैलगाडा शर्यत, मर्दानी खेळांच्या कार्यक्रमांनी गर्दी खेचली होती. तर काल 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात उदयनराजेंची हवेतून बुलेटवरून एंट्री झाली. आज त्यांच्या वाढदिवसाचा मुख्य दिवस असून त्यांच्या समर्थकांसह विविध समस्त सातारकरांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आज ते जलमंदीर पॅलेसमधील भवानी मातेचे दर्शन तसेच राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर पालिका व इतरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता ते ऐतिहासिक गांधी मैदानावरून एक घोषणा करणार आहेत. याबाबत खासदार उदयनराजेंच्या कार्यालयाकडून एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पत्रकात म्हटले की, सध्या आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहता, त्यातील काही अयोग्य वाटतात. त्या कोणीतरी दुरूस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. पण, आम्ही मात्र, एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकिय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. पण ते पुरेसे नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून चिंतनाच्या माध्यमातून या सामाजिक प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वतः एक व्यवस्था उभी करण्याचे ठरवले आहे. कोणता प्रश्न आणि काय व्यवस्था याचे उत्तर सातारकरांना सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानावरून खासदार उदयनराजे जाहीर करणार आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजे कोणती घोषणा करणार याबाबत जिल्ह्याच्या सामाजिक व राजकिय वर्तूळात उत्सुकता ताणली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.