Sachin Kalyanshetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार सचिन कल्याणशेट्टींनी लक्षवेधी मांडताच फडणवीसांनी केली मोठी घोषणा

अक्कलकोट तालुक्यातील शांभवी बार अन थिएटरचा परवाना रद्द

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (जि. सोलापूर) : महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकच्या (Karnataka) सीमेवर असलेल्या दुधनी (ता. अक्कलकोट) येथील शांभवी बार आणि थिएटरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरु आहेत. त्याच्यावर कारवाई करण्याबाबत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी लक्षवेधीद्वारे हा प्रश्न विधानसभेत मांडला होता. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर उत्तर देताना शांभवी बार आणि आर्केस्ट्रा यांचा परवाना रद्द केला आहे. त्याठिकाणचा वीजजोड तोडण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून ते शक्य असल्यास तेही करण्यात येईल, असे स्पष्ट केले. (License of Shambhavi Bar and Theater in Akkalkot taluka cancelled)

आमदार कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधी मांडताना म्हटले होते की, अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे स्थान आहे. देशभरातून भक्त समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात. ते पुढे कर्नाटकातील गाणगापूर येथेही दत्त मंदिरात दर्शनासाठी जात असतात. त्याच रस्त्यावर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांभवी हॉटेलमध्ये अवैध धंदे चालतात. वारंवार छापेमारी केली जाते. पण, ठोस कारवाई मात्र केली जात नाही. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवालदेखील सादर झालेला आहे. तरीही बार आणि आर्केस्ट्राचे लायसन्स अद्याप रद्द झालेले नाही. या बार आणि ऑर्केस्ट्राचे लायसन्स तात्काळ रद्द करण्यात यावे. तसेच, तेथील वीज कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

कल्याणशेट्टी यांच्या प्रश्नावर गृहमंत्री फडणवीस यांनी शांभवी हॉटेल आणि आर्केस्ट्रा यांचा परवांना रद्द करण्यात आला आहे. यापुढे दुधनी परिसरातील अवैध धंद्यांना कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी कडक निर्देश देण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

हवामान माहिती केंद्र वाढविण्याची गरज

शेतीकामे करण्यासाठी शेतकऱ्यांना हवामानासंबंधी अचूक माहिती मिळणे व दिले जाणे, महत्वाचे असते. ज्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यावेळी विमा कंपन्या ह्या स्कायमेटकडूनच सर्व माहिती घेतात. आता ही व्यवस्था मंडलाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तत्परता येत नाही. ग्रामपंचायत स्तरावर अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी झाली तर तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कृषीविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून वेळेत मिळू शकणार आहे. विशेषत: पीक विमा नुकसानभरपाईच्या दरम्यान याचा लाभ होणार आहे. त्यामुळे हवामान माहिती केंद्र संख्या वाढवावी, अशी आग्रही मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT