Sharad Pawar, Vijaysingh Mohite Patil, Dhairysheel Mohite Patil
Sharad Pawar, Vijaysingh Mohite Patil, Dhairysheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 'आमचं ठरलंय!' मोहिते पाटलांनी वाढवली भाजपची धडधड; माढ्यात राजकीय उलथापालथ...

Sunil Balasaheb Dhumal

Madha Political News : माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे. यामुळे येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairysheel Mohite Patil) नाराजी व्यक्त करून बंडाचे निशाण हाती घेण्याची तयारी केल्याचे दिसून येते.

दरम्यान, येथील महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नाही. शरद पवार गटाकडून मोहिते पाटील माढ्याच्या रणांगणात उतरण्याची चर्चा आहे. त्यातच एकीकडे बाळराजे मोहिते पाटलांनी आम्ही तुतारी हाती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हेंनी अकलूज येथील 'शिवरत्न'वर जाऊन मोहिते पाटलांची भेट घेतली आहे. त्यामुळे माढ्यात राजकीय मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

विजयसिंह मोहिते पाटलांचे (Vijaysingh Mohite Patil) बंधू बाळराजे मोहिते पाटलांनी 'आमचं ठरलंय!', म्हणत धैर्यशील हे तुतारी घेऊन रणांगणात उतरतील, असे स्पष्टच करून टाकले. ते म्हणाले, आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही. आमचा पक्ष एकच विजयदादा. आता तुतारी घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्याबाबत शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा होणे गरजेचे आहे. त्यांचा निर्णय महत्त्वाचा आहे. राजकारणात ठराविक वेळेतच काही गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आतापर्यंत आम्ही शांत आहोत. सर्वांचे म्हणणे आहे की, धर्यशील यांनी तुतारीवर लढावे, असे म्हणत बाळराजे मोहितेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी त्यांनी भाजपला अनेक जागांवर फटका बसणार असल्याचेही जाहीरपणे सांगितले. ते म्हणाले, धैर्यशील आता तुतारीवर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे माढ्यात (Madha Lok Sabha Constituency) भाजपला फटका बसणार आहे. माढ्यासह भाजपला सोलापूर आणि बारामतीतही धक्का बसेल. लोकसभाच नाही तर विधानसभेतही भाजपला अनेक जागा गमवाव्या लागणार आहेत. यात माण, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा या विधानसभा असून तेथे धनुष्यबाणाचे उमेदवार येतील, असाही इशारा भाजपला दिला आहे.

एककीडे बाळराजे पाटलांनी भाजपला इशारा दिला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवरत्नवर येत मोहिते कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी अमोल कोल्हे यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते. या भेटीनंतर माढ्याचा आमदार म्हणत धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे शरद पवारांसोबतचे बॅनर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांचे तुतारी हाती घेण्याचे ठरल्याची चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT