Lok Sabha Election 2024 : महायुतीत संघर्षाची ठिणगी? नाशिकमधून भुजबळांच्या चर्चेने शिंदे गट संतप्त; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट...

Shiv Sena Eknath Shinde Group News : नाशिकची जागा गेल्यास शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होऊ शकतो?
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार समर्थक) नेते मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कोणत्याही स्थितीत नाशिकची जागा सोडणार नाहीच, असा निर्धार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे आता नाशिक जागेवरून महायुतीत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

नाशिक मतदारसंघ कोणाचा? यावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रोज नव्या वादाची भर पडत आहे. कालपासून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून नाशिकची जागा गेल्यास शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होऊ शकतो? अशी तक्रार केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Adhalrao Patil Join NCP : वळसे पाटील, मोहितेंच्या खांद्याला खांदा लावून अजितदादांना ताकद देणार; आढळरावांची ग्वाही

आज दुपारी नाशिक शहरात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाचा याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिकचे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचा आहे. त्यांनी युतीचा धर्म पाळून भाजपला पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाने आजवर सातत्याने युतीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे अन्य घटक पक्षांनी शिंदे गटाला टार्गेट करणे चुकीचे आहे. कोणत्याही स्थितीत नाशिक मतदारसंघ शिंदे गटालाच राहिला पाहिजे, अशी भूमिका आणि संतप्त भावना विविध पदाधिकाऱ्यांनी या वेळी मांडल्या.

Lok Sabha Election 2024
Nanded BJP News : चिखलीकरांच्या विजयाची अशोक चव्हाणांना गॅरंटी...

यासंदर्भात पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी नाशिक मतदारसंघ शिंदे गटाचा आहे. तो शिंदे गटालाच (Shiv Sena) राहिला पाहिजे. यावर आम्ही ठाम आहोत. महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिन्ही पक्षांनी युतीचा धर्म पाळला तर असे वाद होणार नाहीत. त्यामुळे ही भूमिका आम्ही अत्यंत संयमाने मांडत आहोत. त्याचा अन्य लोकांनी गैर अर्थ काढू नये, अन्यथा आम्हीदेखील आक्रमकपणे आमची बाजू मांडू शकतो, असे सांगितले.

ही बैठक झाल्यानंतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. आज सायंकाळी महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आहे. या बैठकीदरम्यान नाशिकचे कार्यकर्ते त्यांची भेट घेतील.

Lok Sabha Election 2024
BJP Lok Sabha List: वरुण गांधींना डच्चू; चर्चेतील चेहऱ्यांना भाजपची पसंती, अरुण गोविल, नविन जिंदाल, सीता सोरेन...

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नाशिकच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही जागा शिंदे गटाकडेच राहील, असे सांगितले होते. पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर आमचा ठाम विश्वास आहे. ते कार्यकर्त्यांच्या भावना समजतात. त्यामुळे नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहील, असा प्रयत्न शेवटपर्यंत केला जाईल, असे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com