Raju Shetty Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : माझ्या विरोधात आघाडीने उमेदवार दिला तर..! राजू शेट्टी लोकभावनेवर स्वार

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभेच्या मागील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सर्वाधिक फटका वंचित बहुजन आघाडीचा बसला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत ‘वंचित’ दाखल झाल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणितं बिघडण्याची चिन्हे आहेत. आघाडीने उमेदवार दिल्यास माझी परिणाम स्वीकारण्याची तयारी असल्याचे शेट्टींनी स्पष्ट केलं आहे. (Lok Sabha Election 2024)

2019 च्या पराभवनंतर दुसऱ्या दिवसापासून तयारीला सुरुवात केली आहे. सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढा सुरु आहे. ग्रामीण भागात माझा सतत संपर्क आहे. कोणत्याही आघाडीत (MahaVikas Aghadi) न जाण्याची सर्वसामान्य जनतेची भावना आहे. त्यामुळे कोणत्या पक्षासोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय जनतेचा आहे. माझं काय करावं, ही जनता ठरवणार, अशी प्रतिक्रिया शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली.

स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर बोलताना शेट्टी यांनी, आमच्याविरोधात निवडणूक (Election) लढवायची कr नाही हे महाविकास आघाडीने ठरवावे. पण दोन वर्षांपूर्वीच मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. स्वतंत्र लढण्याचा विचार लोकभावनेचा आहे. त्यामुळे परिणाम स्वीकारायची माझी तयारी असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही जणांचा अहंकार वाढला

गेल्या 10 वर्षात सरकारला शेतकरी व सामान्यांसाठी काहीही करता आले नाही. तर तीन महिन्याच्या बजेटवर काय अपेक्षा ठेवणार. केंद्राच्या फुटकळ तरतुदी अत्यंत निराशाजनक आहेत. जनतेच्या हाताला काही लागणार नाही. पामतेल आयात केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे, त्यामुळे हमीभाव पेक्षा दर कमी झाले.

साखर निर्यातीवर बंदी घातल्याने ऊसाला दर मिळत नाही. केंद्र सरकार केवळ किसान पीएम योजनेचे आकडे तोंडावर फेकत आहे. गेल्या वर्षी किती खते विकली? त्याचे बाजार मूल्य किती होते? बाजार मुल्याची किंमत वजा करून पी एम किसान योजनेची वजाबाकी करून आकडेवारी जाहीर करावी. एकीकडे पीएम किसान योजनेतून दिल्यासारखं करायचं आणि रासायनिक खतातून काढून घ्यायचं. केंद्र सरकारमधील काही लोकांचा अहंकार आणि आत्मविश्वास वाढला आहे, अशा शब्दात शेट्टी यांनी अंतरिम बजेटवर टीका केली.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT