Kolhapur Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress News : कोल्हापूर की हातकणंगले? आजच्या बैठकीत ठरणार काँग्रेसची रणनीती

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची भूमिका काय असेल? याबाबतची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेस (Congress) प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण (Ashok Chavan), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मार्जी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील आदी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. यावेळी कोल्हापूर व हातकणंगलेचा निर्णयही या बैठकीत घेतला जाऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीची भाजप (BJP) व त्यांच्या मित्रपक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेदेखील विभागनिहाय आढावा सुरू केला आहे. आज पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी आमदार, खासदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुपारी बारा वाजता कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगरसेवकांची बैठक होणार आहे. यामध्ये दोनपैकी कोणत्या मतदारसंघावर दावा करायचा? तेथून उमेदवार कोण? याची चाचपणी केली जाणार आहे. कोल्हापुरातून आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, राजू आवळे, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण आदी सहभागी होणार आहेत.

(Edited By - Rajanand More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT