Supriya Sule, Sunetra Pawar, Vijay Sivatare, Mahesh Bhagwat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: पवारांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट, शिवतारेंनंतर 'या' ओबीसी नेत्यानं दंड थोपटले

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे यांच्यानंतर आता ओबीसी बहुजन आघाडीचे महेश भागवत हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Baramati Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येतील तसतशा राज्यातील राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप सर्व मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र, ज्या मतदारसंघातले उमेदवार जाहीर केलेत तिथे मित्रपक्षांमध्ये वाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असाच एक महत्त्वाचा आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ. या मतदारसंघात रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. महायुतीकडून बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे, तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे इथे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. (Supriya Sule and Sunetra Pawar)

सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) हे दोन्ही उमेदवार पवार घराण्यातील असून, पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता कंटाळली असल्याचा दावा करत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivatare) अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. शिवतारेंच्या या भूमिकेमुळे अजित पवार आणि महायुतीची चांगलीच कोंडी झाली आहे. अशातच आणखी वेगळाच ट्विस्ट या मतदारसंघात आला आहे. तो म्हणजे ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांचा पक्षदेखील आता बारामती लोकसभा मतदारसंघात उतरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेंडगेंच्या ओबीसी बहुजन आघाडीडून (OBC Bahujan Aghadi) दौंडमधील महेश भागवत (Mahesh Bhagwat) हे बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसी बहुजन आघाडी बारामतीच्या मैदानात उतरल्यामुळे नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र, राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातील निवडणूक यंदा खूप अटीतटीची होणार यात मात्र शंका नाही.

वंचितच्या साथीला ओबीसी

मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी (MVA) आणि वंचित बहुजन आघाडीत जागावाटपावरून चर्चा चालू होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) योग्य त्या न मिळाल्यामुळे वंचितने आघाडीसोबत जाणं टाळलं, तर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उदयास येण्याची दाट शक्यता आहे. कारण ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आंबेडकरांची भेट घेतली आहे. हे दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) एकत्र लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शेंडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी झाली तर राज्यात राजकीय भूकंप येईल. दरम्यान, प्रकाश शेंडगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आतापर्यंत 3 बैठका झाल्या आहेत. 23 मार्चच्या बैठकीनंतर शेंडगे यांनी राज्यात तिसरी आघाडी होईल अशी अशा व्यक्त केली होती. शिवाय आम्ही 22 जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली असल्याचंही प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं होतं. अशातच आता बारामतीमधून महेश शेंडगे मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT