Madha Lok Sabha 2024: भाजपने उमेदवार बदलावा, अन्यथा तुतारी हाती घ्या; रामराजे कार्यकर्त्यांची भूमिका मान्य करणार का?

Madha Lok Sabha Election 2024: भाजपने माढा मतदारसंघाचा उमेदवार देताना राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांना विचारले नाही. त्यामुळे येथील उमेदवाराला आमचा विरोध असून, हा उमेदवार बदलावा, अन्यथा...
Ramraje Nimbalkar Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Nimbalkar Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Madha Lok Sabha Election 2024 : माढाच्या उमेदवारीवरून सध्या निंबाळकरांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी फलटणमध्ये मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी भाजपने माढा मतदारसंघाचा उमेदवार देताना राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांना विचारले नाही. त्यामुळे येथील उमेदवाराला आमचा विरोध असून, हा उमेदवार बदलावा, अन्यथा संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjivraje Naik-Nimbalkar) यांच्या उमेदवारीसाठी तुतारी हाती घ्यावी, असा इशारा राजेगटाच्या कार्यकर्त्यांनी दिला.

फलटणमध्ये (Phaltan) आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब सोळसकर, यांच्यासह रामराजेंच्या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha) भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीला अजित पवार गटाकडून जोरदार विरोध होत आहे. दोन दिवसांपूर्वी सागर बंगल्यावर रामराजेंची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत फडणवीस यांनी महायुतीचा धर्म पाळवा, अशी सूचना रामराजेंना केली होती. त्यावर रामराजेंनी नकार देत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानंतर आज माढा लोकसभेसाठी फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत मेळावा झाला.

Ramraje Nimbalkar Ranjitsinh Naik Nimbalkar
Mahadev Jankar News : जानकर - मोहिते पाटलांच्या दुसऱ्या भेटीनं माढा मतदारसंघात मोठा ट्विस्ट

या मेळाव्यात सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना मांडताना माढा लोकसभेचा उमेदवार ठरविताना भारतीय जनता पक्षाने (BJP) आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे हा उमेदवार बदलावा, अशी आग्रही मागणी केली. या उमेदवाराला आमचा विरोध असून तो भाजपने बदलला नाही, तर संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी तुतारी हाती घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

Ramraje Nimbalkar Ranjitsinh Naik Nimbalkar
Mohite Patil News : माढ्याबाबत मोठी अपडेट; धैर्यशील मोहिते पाटील पवारांना बारामतीत जाऊन भेटणार?

त्यामुळे आता रामराजे यावर कोणता निर्णय जाहीर करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन तुतारी हाती घेणार का, याची उत्सुकता आहे. असे झाल्यास शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून संजीवराजेंना उमेदवारी मिळणार का? हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com