Devendra Fadnavis, Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : प्रस्थापितांचा प्रचार करणार नाही! आता सदाभाऊंनी वाढवलं युतीचं टेन्शन

Sadabhau Khot News : हातगणंगले मतदारसंघ रजय क्रांती संघटनेला सोडण्यासाठी सदाभाऊ खोत आग्रही आहेत. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Rahul Gadkar

Sangli News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) विविध मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार ठरवत असताना नेत्यांची डोकेदुखी लागली आहे. अनेक इच्छुकांनी कंबर कसली असून, उघडपणे नाराजी बोलून दाखवली जात आहे. आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी बंडाची तलवार उपसली आहे. हातकणंगले मतदारसंघात प्रस्थापितांना प्राधान्य दिले जात आहे. ही जागा आम्हालाच पाहिजे, आम्ही प्रस्थापित नेत्यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा सदाभाऊंनी दिला आहे.

हातकणंगले मतदारसंघ (Hatkanangle Constituency) महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. या मतदारसंघात शिवसेनेचा (Shiv Sena) खासदार असला तरी भाजप (BJP) आग्रही असल्याचे समजते. त्यातच खोत यांनीही हा मतदारसंघ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. 2019 पासून आम्ही ही जागा रयत क्रांती संघटनेला मागत आहे. मात्र, येथे प्रस्थापितांनाच प्राधान्य दिले जात असल्याने आमच्यासारखे विस्थापित दुर्लक्षीतच रहात आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटना लढवणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज भेट घेणार असल्याचे खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितले. ते म्हणाले, सुरुवातीपासूनच प्रस्थापितांविरोधात आमची लढाई  सुरू आहे. आम्ही नेहमी विस्थापितांच्या बाजूनेच राहिलो आहे. मात्र, राजकारणात प्रस्थापित घराणीच आमच्या मानगुटीवर बसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भविष्यात विस्थापित विरुद्ध प्रस्थापित लढाई अधिक तीव्र करणार आहोत. आम्ही महायुतीकडे हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, दुर्दैवाने या मागणीचा विचार होताना दिसत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही निवडणूक लढविण्याची सर्व तयारी केली होती. मात्र, जागावाटपात ही जागा शिवसेनेला गेली. आम्हाला थांबण्याचा सल्ला देण्यात आला. युतीचा धर्म पाळून आम्ही माघार घेतली. प्रचारप्रमुखाची भूमिका बजावून महायुतीचा उमेदवार निवडून आणला, असे खोत यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. आम्ही पुन्हा रस्त्यावरची लढाई लढत सामान्य जनतेशी नाळ कायम ठेवली. आता या निवडणुकीत तरी हातकणंगलेची जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी आम्ही महायुतीकडे केली होती. मात्र, पुन्हा आम्हाला डावलण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही आता प्रस्थापितांचा प्रचार करणार नाही. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका निश्चित करू. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून या जागेसंदर्भात चर्चा करू, असे खोत यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Rajanand More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT