Lok Sabha 2024 : लोकसभेच्या उमेदवारांना पकडलं जातंय खिंडीत, विधानसभेची मागितली जातेय हमी...

प्रत्येक मतदारसंघात यापैकी कोणत्यातरी एका पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्या उमेदवाराला इतर पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी समन्वय साधत सध्या अवघड जात आहे. इतर पक्षातील नेते उमेदवाराकडे विविध मागण्या करत असून, बहुतांशजण विधानसभेचा शब्द घेऊनच लोकसभेला Lok Sabha काम करण्याची भाषा करत आहेत
संग्राम थोपटे- हर्षवर्धन पाटील
संग्राम थोपटे- हर्षवर्धन पाटीलSarkarnama

पुणे - आगामी लोकसभा निवडणुका राजकीय पक्ष महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून एकत्रितरित्या सामोरे जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र आहेत, तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे एकत्रित आहेत.

प्रत्येक मतदारसंघात यापैकी कोणत्यातरी एका पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्या उमेदवाराला इतर पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी समन्वय साधनं सध्या अवघड जात आहे. इतर पक्षातील नेते उमेदवाराकडे विविध मागण्या करत असून, बहुतांशजण विधानसभेचा शब्द घेऊनच लोकसभेला Lok Sabha काम करण्याची भाषा करत आहे. यामुळे अशा नेत्यांना समजावण्यात वरिष्ठ नेत्यांची आणि उमेदवारांची डोकेदुखी वाढत आहे. Lok Sabha Election Aspirants want guarantee for Assembly ticket from Shiv Sena BJP Congress NCP

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून Ajit Pawar उमेदवार देण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या उमेदवाराचं काम भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना करायचं आहे. या वेळी या दोन्ही पक्षांतील नेत्यांना विधानसभेचा शब्द अजित पवारांकडून मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. इंदापूरमधून भाजप नेते हर्षवर्धन पाटील Harshwardhan Patil यांनी यापूर्वीच आपलं मत व्यक्त केले असून, विधानसभेचा शब्द मिळाल्यानंतरच आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करू असं सांगितलं आहे.

तर दुसरीकडे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे Vijay Shivtare यांनादेखील अजित पवारकडून शब्द हवा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे या लोकसभेच्या मैदानात आहेत. या वेळी त्यांना भोर विधानसभा मतदारसंघांमधून बहुमताची अपेक्षा आहे.

हेदेखील वाचा -

संग्राम थोपटे- हर्षवर्धन पाटील
Dhairyasheel Mane : धैर्यशील मानेंचा पत्ता कट, शौमिका महाडिकांना संधी? हातकणंगलेत महायुतीचे गणित काय?

मात्र, इथेदेखील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्याकडून विधानसभेचा शब्द हवा असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेचे राष्ट्रवादीचे काम केल्यानंतर विधानसभेला आपल्या विरोधात राष्ट्रवादी उमेदवार उभा करत असल्याची खंत अनेकदा संग्राम थोपटे यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे यावेळेस सुप्रिया सुळे यांच्याकडून विधानसभेबाबत शब्द घेऊन संग्राम थोपटे कामाला लागले असल्याचं सांगण्यात येत आहे.

अशीच काहीशी परिस्थिती आता पुणे लोकसभा मतदारसंघामध्येही पाहायला मिळत आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर काँग्रेस अंतर्गतच नाराजी पाहायला मिळाली होती ही नाराजी दूर करण्यासाठी तसेच काँग्रेस अंतर्गत समन्वय साधण्यासाठी बुधवारी बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचीदेखील बैठक झाली. बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून कसबा विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबतचा शब्द देऊन तो जाहीररीत्या सांगितला तरच आम्ही लोकसभेचे काम करू, असंदेखील शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. या माध्यमातून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस समोर आली असून, आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तेव्हा पळ काढू नका

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा आहे, तर बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार आणि मावळमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे असणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी बारामती आणि मावळमध्ये जाऊ नये, त्यांनी आताच प्रचारासाठी जावे. प्रचार जोमात आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी पळ काढू नये. तसे केले तर बारामती आणि मावळ मतदारसंघांतील कार्यकर्तेही पुण्याकडे येतील, असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत दिला.

हेदेखील वाचा -

R

संग्राम थोपटे- हर्षवर्धन पाटील
Navneet Rana : मध्यरात्री नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश, बावनकुळेंची मात्र एका गोष्टीवरुन नाराजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com