Solapur News, 4 May : माढा लोकसभा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Constituency ) कधी नव्हे एवढे ट्विस्टवर ट्विस्ट घडले आहेत. गेले काही दिवस मोहिते-पाटील ( Mohite Patil ) आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे निवडणुकीचं वातावरण तापलं होतं. पण, आता प्रचाराच्या तोफा रविवारी ( 5 मे ) थंडावणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांची अकलूजमध्ये सभा पार पडली. या सभेतून उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
"राज्यात 77 हजार कोटींचा घोटाळा करणारा आदल्या दिवशी कावळा होता. नंतर महाराष्ट्राला लावून लावून उरलेला चुना या कावळ्याला लावत बगळा केला. तो बगळा आता पांढरा शुभ्र झाला," असा हल्लाबोल उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील ( Vijaysinh Mohite Patil ), धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ), राष्ट्रवादीचे नेते भूषणसिंहराजे होळकर उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"घोटाळेबाजांचा पैसा आणून गोरगरिबांना वाटायचा आहे"
उत्तम जानकर ( Uttam Jankar ) म्हणाले, "भाजपत गेलं तर राम आणि पक्ष सोडला की लगेच दाऊद इब्राहिम होतो. सत्तेत लाखो घोटाळेबाज आहेत. त्या घोटाळेबाजांचा पैसा आणून गोरगरिबांना वाटायचा आहे. आपल्या राज्यातील 77 हजार कोटींचा घोटाळा करणारा एक माणूस सापडला आहे. आदल्या दिवशी कावळा होता. सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून उरलेला चुना या कावळ्याला लावत बगळा केला. तो बगळा आता पांढरा शुभ्र झाला असून मतदाररूपी मासे हुडकत आहे."
"मी मित्रासह शत्रूला दिलेला शब्द देखील पाळतो"
"कुणी फुटून गेले म्हणून नेतृत्व कधीही विझत नाही. एवढी दहशत मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. तीन चार वेळा झालेल्या चर्चेनंतर मी फडणवीस यांच्या गळाला लागेल, असं त्यांना वाटत होते. माझ्यासाठी चॅर्टर विमान पाठवण्यात आलं. नंतर नागपूरला बैठकीसाठी गेलो. तिथे मी फडणवीसांना सांगितलं, तुमच्या फसवणुकीला कंटाळलो आहे. तेव्हा, चंद्र, सूर्य सोडून सगळं द्यायचं ठरलं होतं. तसेच, नितीन गडकरी, अमित शहा यांच्याकडून पक्का शब्द देण्याचं आश्वासन दिलं. पण, मी मित्रासह शत्रूला दिलेला शब्द देखील पाळतो. तसंच, त्याच विमानातून उडी मारली. हात, पाय मोडेल याची चिंता केली नाही. कारण, मोहिते-पाटलांचे एक लाख आणि माझे एक लाख, असं दोन लाख कार्यकर्ते हाताची झोळी करून मला झेलतील, हे माहिती होतं. त्यामुळे मी विमानातून उडली मारली. संघर्ष माझ्या रक्तात आहे. हा संघर्ष अजितदादांसारखा नाही," असा टोलाही जानकर यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.