Uttam Jankar News : उत्तम जानकरांचा शहाजीबापूंवर पलटवार; 'सुपारी फुटली, हळद लागली आता...'

Shahaji Patil And Madha : लगीन जुळत आलं होतं; पण नवरदेवाने एवढा हुंडा मागितला की आम्ही बेशुद्ध पडायचं राहिलो होतो, अशी टीका आमदार शहाजी पाटलांनी उत्तम जानकरांवर केली होती.
Uttam Jankar, Shahaji Patil
Uttam Jankar, Shahaji PatilSarkarnama
Published on
Updated on

Madha Lok Sabha Political News : उत्तम जानकरांनी अजित पवार गटात उघड उघड बंडखोरी करून माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी काम करत आहेत. तत्पूर्वी जानकरांनी महायुती सोडू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी Devendra Fadnavis खूप प्रयत्न केले.

जानकरांसाठी त्यांनी थेट खासगी विमानाची सोय करून नागपूरला बोलावून घेतले. तेथे चर्चा झाली तरी जानकरांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम करण्यावर ठाम राहिले. यावर सांगोल्याचे आमदार शाहाजी पाटलांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत जानकरांवर टीका केली. जानकरांनीही त्याच शब्दात बापूंच्या टीकेची परतफेड केली.

फडणवीसांना भेटल्यानंतरही उत्तम जानकरांनी Uttam Jankar भाजपला आव्हान देत महाविकास आघाडीसाठी प्रचार करण्याचा निर्णय घेतला. यावर भेटीत नेमके काय झाले, यावर भाष्य करताना शहाजीबापू पाटलांनी उत्तम जानकरांवर मोजक्या पण शेलक्या शब्दांत टीका केली होती. शहाजीबापू म्हणाले, लगीन जुळत आलं होतं; पण नवरदेवाने एवढा हुंडा मागितला की आम्ही बेशुद्ध पडायचं राहिलो होतो, असे म्हणत पाटलांनी, तडजोडीसाठी जानकरांनी मोठी अट ठेवल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न केला होता.

Uttam Jankar, Shahaji Patil
Uttam Jankar : उत्तम जानकरांनी भाजपला धू धू धुतले; नेमके काय म्हणाले?

पाटलांनी केलेल्या या टीकेचा जानकरांनी सडतोड प्रत्युत्तर दिले आहे. बापूंना वाटत होते की मी काहीतरी खोक्यात तडजोड करावी. पण सांगोलकरांनी ठरवले आहे. सांगोल्यातून बापूंचा Shahaji Patil पराभव करणार असल्याचा इशाराच जानकरांनी दिला. ते म्हणाले, बापूची सुपारी मुंबईत फुटली, हळद गुवाहटीला लागली आता त्यांचा कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे. सांगोलकर त्यांचा 50 खोक्यांनी पराभव करणार आहेत. बापू, सांगोलकर आता तुमचा 50 हजार मतांनी पराभव करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून दमबाजी

गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने करंटेपणा, नालायकपणा केला आहे. माळशिरसमधून एक लाख 16 हजार मताधिक्य देऊनही 2019 ला आमदारकीचे तिकीट नाकारले. त्यावेळी बीडवरून माणूस आणला आणि मोहिते पाटील आणि माझे नेतृत्व संपवण्याचा डाव भाजपने टाकला. आता लोकसभेची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी तर दिलीच नाही, पण पक्षसुद्धा सोडून जायचा नाही, असा दम देण्यात आला. तुमचा जातीचा दाखला ठेवणार नाही. निवडणूक झाल्या झाल्या तुम्हाला तुरुंगात टाकू, अशी भाषा वापरण्यात येत होती. भाजपने इतका दम दिला की त्यापूर्वी असा दम कुणीच दिला नाही, असा थेट आरोप उत्तम जानकरांनी भाजपवर केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Uttam Jankar, Shahaji Patil
Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात चर्चा दोन धरणांची, उतराई कोणावर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com