Vishal Patil sarkaranma
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha Election 2024 : विशाल पाटील भिडणार की 'ऑफर' स्वीकारणार?

Vishal Patil News : विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं असून, त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे.

सरकारनामा ब्युरो

महाविकास आघाडीत काँग्रेसची ( Congress ) कोंडी झाल्यानंतर बंडाचा पवित्रा घेणारे काँग्रेस नेते विशाल पाटील ( Vishal Patil ) लोकसभेला भिडणार की विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून बंड थंड करणार, याचा फैसला आज, सोमवारी ( 22 एप्रिल ) होणार आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे सांगलीसह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातील ( Sangli Lok Sabha Constituency ) अर्ज माघारीची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजता संपत आहे. त्याआधी आमदार विश्वजित कदम ( Vishwajeet Kadam ) व विशाल पाटील ( Vishal Patil ) यांच्यावर काँग्रेसकडून ( Congress ) प्रचंड दबाव टाकला जात आहे. सोबतच त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत भाजपचे संजय पाटील ( Sanjay Patil ), महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र, भाजप विरुद्ध काँग्रेस बंडखोर, अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला जात आहे. पाटील यांची कोंडी केली जात असल्याच्या भावनेतून आज जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी विशाल यांची भेट घेतली. कोणत्याही स्थितीत मागे फिरू नका, असे आवाहन केले. विशाल पाटील यांनी लढण्यावर ठाम असल्याचे सांगत त्यांना आश्वस्त केले.

प्रतीक पाटील कार्यकर्त्यांमागे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांचा निर्णय काय असेल, याकडे विशेष लक्ष असेल. याशिवाय, एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे विशाल पाटील यांनी माघार घेतली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी अर्ज भरला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT