शिवसेनेला आवाज वसंतदादांनी दिला आहे. तोच आवाज वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय, हे दुर्दैव आहे. ही लढाई भाजपच्या विरोधातील आहे, आपल्यातील नाही. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहे. कारण, भाजपचा पराभव झाला पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि बंडखोर उमेदवार विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी केला आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विशाल पाटील नाराज झाले होते. अखेर कुठलाही तोडगा निघत नसल्यानं विशाल पाटलांनी ( Vishal Patil ) बंड करत काँग्रेस आणि अपक्ष, असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"संजय राऊत सांगलीत येऊन बराच गोंधळ घालून गेले आहेत. सांगली ही सुसंस्कृत आहे. इथे शोभणारी भाषा बोलावी. आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत. त्यामुळे पुस्तकातले शब्द वापरून लोकांना पेटवू नये. राजकारण सगळ्यांनी संयमानं करावं," असं म्हणत विशाल पाटलांनी राऊतांना फटकारलं आहे.
"मी जेव्हा, जेव्हा उभे राहिलो, पक्षानं थांबा म्हटल्यावर थांबलो. काँग्रेस पक्षावर आमचं प्रेम एकतर्फी आहे. जुन्या काळात हिंदी सिनेमातील एक गाण होतं. 'कितने भी तू करले सितम, हस हस के सहेंगे हम, ये प्यार ना होंगा कम...' त्यामुळे किती जरी आम्हाला छळलं त्रास दिला, तरी काँग्रेसवरील आमचं प्रेम कमी होणार नाही," असं विशाल पाटलांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.