vasantdada patil vishal patil jayant patil rajarambapu patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil News : जयंतरावांना विशालदादांनी करून दिली वसंतदादांच्या 'त्या' विधानाची आठवण

Vishal Patil On Congress : "किती जरी आम्हाला छळलं त्रास दिला, तरी काँग्रेसवरील आमचं प्रेम कमी होणार नाही," असंही विशाल पाटलांनी म्हटलं.

Akshay Sabale

सांगली लोकसभा मतदारसंघावरून ( Sangli Lok Sabha Election ) महाविकास आघाडीत तिढा वाढला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी बंडखोरी करत काँग्रेस आणि अपक्ष, असे दोन अर्ज दाखल केले आहेत. यानंतर झालेल्या जाहीर सभेत विशाल पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांना माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय वसंतदादा पाटील ( Vasantdada patil ) यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे.

"निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होत होतं, तेव्हा डाव रंगू लागला. परत राजकारण आडवं येऊ लागलं, मी ठरवलं यंदा कुणाच्या वादात पडायचं नाही. कुणीतरी बोललं, जुना वाद अजून आहे. पण, वसंतदादांनी सांगितलेलं, 'ज्या दिवशी राजारामबापूंचं निधन झालं आणि वाद संपला.' आमच्या दृष्टीनं तेव्हाच वाद संपलेला आहे. तुमच्या मनात वाद असेल, तर तो तुम्ही संपवावा. आमच्याकडून वादाची भावना नाही," असं आवाहन विशाल पाटलांनी ( Vishal Patil ) जयंत पाटलांना ( Jayant Patil ) केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्यांचा मुलगा खासदार झालेला पाहवत नाही का? वसंतदादांच्या घराण्यानं शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद देण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या मुलानं आमदार, खासदार झालं पाहिजे ही आमची इच्छा आहे. शेतकऱ्याच्या मुलाला फसवून बळी नाही गेला पाहिजे, हीसुद्धा पाहायची आमची जबाबदारी आहे," असं विशाल पाटलांनी म्हटलं.

"शिवसेनेला वसंतदादांनी आवाज दिला, तोच आवाज वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय, है दुर्दैव आहे. ही लढाई भाजपच्या विरोधात आहे, आपल्यातील नाही. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहे. कारण, भाजपचा पराभव झाला पाहिजे," असा निर्धार विशाल पाटलांनी व्यक्त केला.

"मी जेव्हा, जेव्हा उभे राहिलो, पक्षानं थांबा म्हटल्यावर थांबलो. काँग्रेस पक्षावर आमचं प्रेम एकतर्फी आहे. जुन्या काळात हिंदी सिनेमातील एक गाणं होतं. 'कितने भी तू करले सितम, हस हस के सहेंगे हम, ये प्यार ना होंगा कम...' त्यामुळे कितीजरी आम्हाला छळलं त्रास दिला, तरी काँग्रेसवरील आमचं प्रेम कमी होणार नाही," असं विशाल पाटलांनी सांगितलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT