Kolhapur Hatkanangle Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 Voting : कोल्हापूर, हातकणंगलेत चुरशीने मतदान; 'हे' तालुके दुपारपर्यंत आघाडीवर

Rahul Gadkar

Kolhapur Hatkanangle Lok Sabha Constituency: आज देशभरातली अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यासाठीचे (Lok Sabha Election Phase 3) मतदान पार पडत आहे. यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघांचा समावेश असून इथे प्रचंड चुरशीचे मतदान होत असल्याचं दिसत आहे. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.

कोल्हापुरात दुपारी तीन वाजेपर्यंत 51.51% मतदान झाले. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha Constituency) 49.94% मतदान झाले आहे. तसेच हातकणंगले विधानसभा क्षेत्रात 53.52 %, इचलकरंजीत 47%, इस्लामपूर मध्ये 49.60%, शाहूवाडीत 52.13%, शिराळामध्ये 47.42%, तर शिरोळ विधानसभा क्षेत्रात 49.61% मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापुरात (Kolhapur) महाविकास आघाडीचे शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे. तर हातकणंगले मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहे. राजू शेट्टी, (Raju Shetti) शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात ही लढत होत आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळच्या सत्रात आघाडीवर असलेल्या इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात दुपारपर्यंत 47% इतके कमी मतदान, तर हातकणंगले विधानसभा क्षेत्रात 53.52% आतापर्यंत मतदान झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दुपारपर्यंत विक्रमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे. तर चंदगडमध्ये 51.45%, कागलमध्ये 54.70%, करवीरमध्ये 56.22%, कोल्हापूर उत्तर 49.54% तर कोल्हापूर दक्षिणेत 45.62% इतके मतदान झाले आहे. तसेच राधानगरीमध्ये 51.89% मतदान पार पडले आहे.

करवीर विधानसभा आघाडीवर

तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये करवीर विधानसभा क्षेत्र मतदानाच्या टक्केवारीत सध्या आघाडीवर असून इथे दुपारपर्यंत 56.22% इतके मतदान झाल्याचे नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत अनेक मतदारांनी उन्हाची पर्वा न करता आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी हजरी लावल्याचं पाहायला मिळत आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT