Chandrahar Patil Joins Shivsena UBT Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrahar Patil Join Shivsena UBT : 'अब की बार चंद्रहार!' सांगलीसाठी ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी पाटील उमेदवार

Sangli Lok Sabha Constituency : कुस्ती क्षेत्रात काम करताना आम्हाला करून दाखवायची सवय आहे. आता सांगलीचा विजय पक्का समजा असे दंड थोपटत निवडणुकीआधीच पाटलांनी निकालही जाहीर केला.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार होत असताना सर्व राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची शर्यत लागल्याचे दिसत आहे. महायुती आणि महाआघाडीत कुणाला किती जागा मिळणार, यावर रोजच मॅरेथॉन बैठका होत आहेत. अशातच डबल महाराष्ट्र केसरी आणि सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पै. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षात प्रवेश केला. कुस्ती क्षेत्रात काम करताना आम्हाला बोलून नाही तर करून दाखवायची सवय आहे. आता सांगलीचा विजय पक्का समजा असे दंड थोपटत निवडणुकीआधीच पाटलांनी निकालही जाहीर केला. या वेळी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी 'अब की बार चंद्रहार' अशा घोषणांनी 'मातोश्री'चा परिसर दणाणून सोडला.

चंद्रहार पाटलांनी (Chandrahar Patil) यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. यासाठी ते वंचितच्याही संपर्का होते. मात्र, महाविकास आघाडीत कोल्हापूर आणि सांगली जागांबाबत समझाेता झाला. त्यानुसार काँग्रेसकडे कोल्हापूर आणि सांगलीची जागा ठाकरे गटाकडे आली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना भेटायला बोलावले होते. तेथील चर्चेनंतर पाटलांना सांगलीतून उमेदवारी देण्यावर निश्चित मानले जात होते. त्यानतंर सोमवारी चंद्रहार पाटलांनी अधिकृतपणे ठाकरेंच्या नेतृत्वात शिवबंधन हातात बांधले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एका शेतकऱ्याच्या मुलाला सांगली लोकसभेच्या दृष्टीने सन्मान दिलेला आहे. कुस्ती क्षेत्रात काम करताना आम्हाला बोलण्याऐवजी करून दाखवायची सवय आहे. अजून बरेच बाहेर यायचे असल्याने आता जास्त बोलत नाही. मात्र, आजच सांगतो की महाराष्ट्रातून सांगलीचा पहिला निकाल लागलेला असेल, असे वचन देत पाटलांनी लोकसभेसाठी दंड थोपटले. त्यानंतर चंद्रहार पाटलांनी ठाकरेंना गदा भेट दिली.

दरम्यान, पाटलांच्या कार्यकर्त्यांनी 'अब की बार चंद्रहार', 'अब की बार मोदी की हार' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या वेळी उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांवर शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदाचीही जबाबदारी सोपवली आहे. ते म्हणाले, जनतेने आता निवडणुकीचे संकेत दिले आहेत. गदा आणि मशाल घेऊन सांगलीचा (Sangli) मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. आता सभेसाठी सांगलीत येणार आहे. तुम्ही म्हणाल तेथे सभा घेणार. राज्यातील गद्दारांना आडवे करायचे आहे. देशातील हुकूमशाही संपवण्यासाठी तुमच्यासारख्या मर्द तरुणांची गरज आहे. चंद्रहार पाटलांना शेतकऱ्यांच्या गदेचे ओझे पेलायचे आहे, असे आवाहनही ठाकरेंनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT