Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Ambedkar On BJP : लोकसभेच्या निवडणुका विधानसभांपूर्वीच होतील; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

सरकारनामा ब्यूरो

महेश माळवे

Ahmednagar News : भाजप विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने खासदार राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे करावे, पण प्रवक्ता म्हणून नको. तुमच्या पंतप्रधानावर 'अटॅक' होणार असेल तर ती चांगली गोष्ट नाही. त्याऐवजी तेजस्वी यादव, प्रियंका चतुर्वेदी यांसारखे तरुण चेहरे ते देऊ शकतात. राज्या-राज्यांमध्ये असलेली सरकारे केंद्र सरकारला आव्हान आहेत. हिंदी पट्ट्यातून भाजप सरकार सत्तेत येत असून तेथून भाजपला आव्हान सुरू झालेले आहे. त्यामुळे आगामी काळात चार राज्यांच्या निवडणुका होणार नसून त्याआधी लोकसभेच्या निवडणुका होतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला. (Latest Political News)

श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी राज्यासह देशातील बदलत्या राजकारणावर स्पष्ट शब्दात भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यात उत्तर प्रदेश, बिहारसारखी स्थिती झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "महाराष्ट्राचे राजकारण तत्वाचे व बांधिलकीचे असल्याचा टेंभा मिरविला जात आहे. यापूर्वी यूपी, बिहारमध्ये आयाराम-गयारामाचे राजकारण पाहायला मिळायचे. तशीच स्थिती अलिकडच्या काळात महाराष्ट्राचीही झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र व केंद्राच्या राजकारणामध्ये निश्चित बदल होणार आहे. " भाजपमध्ये गेलो तर आपली चौकशी थांबेल अशा मानसिकतेत आयाराम-गयाराम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळांच्या आठवणीवर बोलताना आंबेडकरांनी सांगितले, "भाजपचा ग्रामीण बेस हा शिवसेना होता. शिवसेनेमुळे त्यांना मतदारांवर प्रभाव टाकणे सोपे जात असल्यानेच सेना-भाजप विजयी होत होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व नामदेव ढसाळांचे दलित पँथर दोघांचा ढाचा एकच होता, तो म्हणजे सामूहिक जमाविकरण व प्र्भाव. त्यातून त्यांनी सामान्य लोकांवर आपला पगडा निर्माण केला. परंतु, संघटना बांधणी करून ती खालपर्यंत उभी करणे दोघांनाही जमले नाही."

पुढील निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे आंबेडकरांनी यावेळी सांगितले. "भाजपचे बांधलेले व टेबल नेटवर्क सक्षम असल्यामुळे त्यांना देशात सत्ता बदल करता आला. परंतु नजीकच्या काळामध्ये जेव्हा केव्हा निवडणूक होतील त्या विधानसभा असो की, लोकसभा यात सर्वात मार खाणारा पक्ष हा भाजप असेल. त्यांचे टेबल नेटवर्क मजबूत असले तरी प्रभाव पाडणारे नेतृत्व त्यांच्याकडे नाही", असा दावाही त्यांनी केला.

पवारांना सन्मानाने निवृत्त होवू द्या !

अजित व शरद पवार यांची तुलना झाल्यास अजित पवार केवळ पाच टक्के इतकेही नाही. शरद पवार हे दहा वर्षांपूर्वी निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडले. मात्र, संघटनात्मक राजकारणातून बाहेर पडतील त्यावेळी आम्ही अजित पवार का निवडावा असे जुने मराठा नेते व काही तरूण पिढीतून मत व्यक्त केले जाते. ते काही वर्षानंतर निवृत्त होतील, त्यांना सन्मानाने निवृत्त होऊ द्यावे, असाही एक मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT