Amit Shah In Loksabha : काश्मीरला हिंसाचारमुक्त केले, सात राज्यातील नक्षलवादही संपवला; अमित शाहांचा दावा

Amit Shah Attack On Congress : काश्मीरमध्ये ३३ वर्षांनी थिएटर उघडली
Amit Shah
Amit ShahSarkarnama

Delhi News : केंद्रातील `एनडीए`सरकारवरील अविश्वास प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सायंकाळी सडेतोड उत्तर दिले.आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी काश्मीरला हिंसाचारमुक्त केल्याचा मोठा दावा केला. तसेच 'यूपीए' राजवटीत देशाच्या आठ राज्यात असलेला नक्षलवाद 'एनडीए'च्या काळात फक्त एका राज्यात तीन जिल्ह्यांपुरता उऱला असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest political News)

मणिपूर राज्यातील हिंसाचारावर बोलताना फक्त तीन महिन्यांतच तो कमी झाल्याचा दावा शहा यांनी केला. यापूर्वी 'यूपीए' राजवटीत तेथे तो वर्षभर सुरु राहत होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी झालेल्या हिंसाचाराची आकडेवारीसहीत त्यांनी उदाहरणेही यावेळी दिली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान विरोधकांच्या आरोपाला सामोरे गेले नाहीत. त्यांनी उत्तरे दिली नाहीत. त्यावेळचे गृहराज्यमंत्री त्यावर बोलले. मग, आताच पंतप्रधान मोदींनी त्यावर बोलावे, असा आग्रह का अशी विचारणा त्यांनी केली.

Amit Shah
Malegaon Sakhar Karkhana : माळेगाव कारखान्याच्या कामगारांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयात नेमकं काय झालं?

२९ एप्रिलला पसरलेली एक अफवा आणि त्यानंतर मैतेई जमातीला आदीवासी म्हणून उच्च न्यायालयाने दिलेला निकाल यातून मणिपूरचा हिंसाचार उफाळल्याचे शहांनी सांगितले. तो शमविण्यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केल्याने त्यांना बदलले नाही वा तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी विरोधकांच्या आरोपावर दिले. आतापर्यंत मणिपूरमध्ये १५२ जणांचा बळी गेल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. मणिपूरची दंगल उग्र होण्यास कारणीभूत ठरलेला महिलेचा तो व्हिडीओ नेमका संसदेचे अधिवेशन सुरु व्हायच्या एक दिवस आधी कसा सोशल मीडियात व्हायरल झाला, याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली.

Amit Shah
Adhir Ranjan Chowdhury : शाहांचे संसदेत दोन तास भाषण; काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचे दोन ओळीत खणखणीत उत्तर

'यूपीए' सरकारच्या काळात १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करून त्याची जंत्री शहा यांनी वाचून दाखवली. त्यात महाराष्ट्रातील आदर्श घोटाळा, मुंबई शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता याने केलेला घोटाळा, पुण्यातील घोडे व्यापारी हसन अलीचा घोटाळा यांचाही उल्लेख होता. 'यूपीए' सरकारच्या काळात आठ राज्ये हिंसाचारग्रस्त तथा नक्षलग्रस्त होती. आता फक्त छत्तीसगडमध्ये तीन जिल्ह्यांत नक्षलवाद राहिला असल्याचे त्यांनी सांगतिले. काश्मीरला हिंसाचारमुक्त केल्याचा मोठा दावा त्यांनी यावेळी केला. तेथे ३३ वर्षांनी थिएटर उघडली. मोहरमची मिरवणूक निघाली, असे ते म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com