Solapur Political News : माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपविरोधात वातावरण आहे, अशी स्पष्ट कबुलीच महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिली. काळेंच्या या स्पष्ट वक्तव्याने मात्र सोलापूर Solapur जिल्ह्यातील भाजपसह अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे. Solapur, Madha is not favor to BJP.
लोकसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराने कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली. त्यासाठी कल्याणराव काळे, भगीरथ भालके Bagirath Bhalke, युवराज पाटील, गणेश पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील गावानिहाय सविस्तर केली. त्यानंतर काळेंनी थेट दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या विरोधात वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे. काळेंच्या या विधानाने जिल्ह्यातील महायुतीत नाराजीचे वातावरण पसरले आहे.
कल्याणराव काळे Kalyanrao Kale म्हणाले, तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीपूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. त्यानुसार आता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यामध्ये काही लोकांनी पहिल्या उमेदवाराविषयी नाराजी असल्याचे सांगितले. काहींनी कामे झाली नाहीत असे सांगितले. मतदारांची मानसिकता बदलली आहे. ग्राउंड रिपोर्टनुसार सोलापूर आणि माढ्यात Madha भाजपविरोधात वातावरण आहे. ते वातावरण सकारात्मक करावे लागणार आहे, असेही काळेंनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू आहे. सोलापूरमधील 56 तर माढ्यातील 39 गावांतील लोकांची मते जाणून घेण्यात आलेली आहेत. दोन दिवस पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. पुढच्या दोन दिवसांत मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांची मते जाणून घेणार असल्याचेही काळेंनी या वेळी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.