Satara Lok Sabha News : सातारा लोकसभा मतदारसंघातील Satara Loksabha Constituency राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा NCP उमेदवार निश्चित झाला असून, खासदार शरद पवार यांनी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde या संघर्ष योद्ध्यालाच रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा येत्या एक दोन दिवसांत होणार आहे. त्यामुळे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे अशी तुल्यबळ लढत होणार आहे. येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातारा लोकसभा मतदारसंघात Satara Constituency महायुतीकडून भाजपचे BJP राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आता त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे सुरू केले आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंच्या Udayanraje Bhosale विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर शरद पवारांनी चार इच्छुकांपैकी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा थेट सामना होणार आहे. latest Satara political update
आमदार शशिकांत शिंदेंनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन 'कोण लढणार आहेत का बघा, नाही तर मी आहेच' असे सांगून टाकले होते. त्यानुसार खासदार शरद पवार यांनी अखेर आपला संघर्ष योद्धा शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. येत्या १५ एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यासाठी खुद्द खासदार शरद पवार साताऱ्यात येणार आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
Edited BY : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.