Lok Sabha Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election : कोण आजारी तर कोणाच्या घरात लग्नकार्य, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या 400 कर्मचाऱ्यांना नोटीस

Election Commission : मतदारसंघनिहाय कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election : कोणाची तब्येत ठीक नाही तर कोणाच्या घरी लग्नकार्य आहे. तर अन्य कोणीतरी काही कारण देत लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत. संबंधीत कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न आल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार असल्याचा इशाराही या नोटीसीतून देण्यात आला आहे.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी (Kolhapur loksabha Election) विधानसभा मतदारसंघ निहाय कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पार पडले. 5 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक एक व दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात संपूर्ण मतदान प्रक्रिया विविध अर्ज नमुने कामाचे स्वरूप याची माहिती देण्यात आली.

शिवाय मतदान यंत्रात बिघाड झाल्यास परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रशिक्षण पार पडले. यासह विविध टप्प्यातील माहिती देण्यात आली. मात्र या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी जवळपास 400 हून अधिक कर्मचाऱ्यांनी गैरहजरी लावली. त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. जवळपास 400 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

दरम्यान, निवडणुकीत आपली ड्युटी रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज निवडणूक कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. कोणाची तब्येत बरी नाही, कोणाच्या घरी लग्नकार्य आहेत. काही लोकांच्या घरी विविध कार्यक्रम, मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे आपण उपस्थित राहू शकणार नाही त्यामुळे ड्युटी रद्द करावी अशी मागणीचे अर्ज ही मोठ्या प्रमाणात निवडणूक कार्यालयाकडे आले आहेत. मात्र प्रशिक्षणावेळीच गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य कारण देता नाही आले. तर त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. शिवाय योग्य कारण असल्याखेरीज कोणाचीही ड्युटी रद्द होणार नाही. तसा कोणी प्रयत्नही करू नये असा स्पष्ट इशारा कोल्हापूरचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला आहे.

Edited By : Rashmi Mane

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT